Burj Khalifa Advertisement Rate: जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) ही दुबई (Dubai) या देशात आहे. या इमारतीची उंची जवळपास 830 मीटर आहे. या इमारतीमध्ये तब्बल 163 मजले असून 57 लिफ्ट आहे. या इमारतीच्या तळमजला व वरचा मजला यांच्या तापमानातदेखील फरक असतो. इतक्या मोठया या इमारतीवर विविध उदयोजक जाहिरातींचे प्रमोशन करतात. नुकताच शाहरूख खान (Shahrukh Khan) च्या ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाचादेखील या इमारतीवर ट्रेलर दाखविण्यात आला. मात्र तुम्हाला माहिती का, या इमारतीवर जाहिरात दाखविण्याचा किती खर्च येतो? चला, तर मग यासंबंधी जाणून घेवुयात
बुर्ज खलिफावर जाहिरातीसाठी किती खर्च येतो? (How much does it Cost to Advertise on Burj Khalifa)
बुर्ज खलिफावर शक्यतो रात्रीच्या वेळीच जाहिराती दाखविल्या जातात. रात्रीच्या वेळी लेझरच्या झोतात या जाहिराती अधिक आकर्षक दिसतात. या जाहिराती दाखविण्याची वेळ रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच आहे. बुर्ज खलिफा इमारतीवर 3 मिनिटांची जाहिरात दाखविण्यासाठी अंदाजे तब्बल 50 लाख रूपये मॅनेजमेंट टीमकडून घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. तसेच ही जाहिरात वर्किंग डे व्यतिरिक्त शनिवार व रविवारी दाखवायची असेल तर याचे चार्जेस अंदाजे 70 लाख रूपयांपर्यंत आकारले जात असल्याची माहिती आहे.
भारताचा तिरंगादेखील फडकविला होता? (India's Tricolor was also Hoisted)
बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगादेखील फडकविण्यात आला होता. मात्र यासाठी कोणतेही चार्जेस आकारले गेले नव्हते. कारण बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकावणे हे UAE देशाच्या परराष्ट्र धोरणांपैकी एक धोरण असल्याचे सांगितले जाते. भारताचे नव्हे, तर कोणत्याही देशाचा ध्यज फडकविण्यासाठी चार्जेस घेतले जाते नाही. याव्दारे बुर्ज खलिफाच्या मॅनेजमेंट कंपनीकडून हा एक मैत्रींचा संदेश दिला जातो. या उंच इमारतीवर “मुलन लोव मिना” ही मार्केटिंग कंपनी लाईट शोचे व्यवस्थापन करत असते.