Tax : प्रत्येक गावाचा कार्यभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असते. ग्रामपंचायतीला उत्पन्न पाणीपट्टी, घरपट्टी, यात्राकर यामधूनच ग्रामपंचायतीचे प्रमुख उत्पन्न असते. आपण भरलेल्या टॅक्सच्या माध्यमातून ग्रामपंचायत गावातील सर्व सुविधा आणि कामे पूर्ण करतात. आपण जर टॅक्स वेळवर भरला नाही तर ग्रामपंचायतकडून मिळणाऱ्या सुविधा वेळवर पुरवल्या जात नाही. त्यामुळे टॅक्स भरणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम 2015नुसार प्रत्येक मालमत्ता धारकाला कर भरावा लागतो. कर हा प्रत्येकाला भरावाचा लागतो कर माफी कधीच होत नाही सोबत कर थकीत गेला असेल त्याबरोबर व्याज आकारले जाते. दरवर्षी व्याज 5 टक्के स्वरूपात व्याज भरावे लागते.
Table of contents [Show]
ग्रामपंचायत कर कोणकोणते आहेत?
- पाणी पट्टी कर
- घर पट्टी कर
- दिवा बत्ती कर
- आरोग्य कर
कर आकारणी कशाप्रकारे केली जाते?
- कर आकारणी समितीकडून चार वर्षांनी कर आकारणी बदल केले जातात.
- आर्थिक वर्षे यानुसार 1एप्रिल ते 31 मार्च यानुसार कर आकारणी केली जाते.
- आर्थिक वर्षेमध्ये प्रथम सहा महिने कालावधी मध्ये कर भरणा केला तर विशेष सवलत मिळतं असते, ही कर भरणा सवलत 5% होय.
- चालू आर्थिक वर्षे मध्ये कर भरला नाही तर करसोबत दंड भरावा लागतो.
- थकीत करावर 5 टक्के दंड भरावा लागतो.
ग्रामपंचायत करामधून सूट मिळते का?
ग्रामपंचायत करामधून सूट मिळू शकते, पण जर तुमचे घर असेल आणि तिथे कोणी राहत नाही, अशा वेळी करामध्ये सूट दिली जाते. तर तशी नोटीस आणि अर्ज द्यावा लागतो त्याचप्रमाणे सरपंच आणि ग्रामसेवक यांना अर्ज दिला आपल्याला सूट मिळू शकते. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेअंतर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्यात येते.
ग्रामपंचायत कर न भरल्यास काय होते?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम 2015 यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच, थकबाकी रकमेवर दरवर्षी व्याजसुद्धा भरावे लागते. कर भरण्याची नोटीस पाठवून कर भरला नाही तर कराच्या रकमेच्या वस्तू जप्त करून लिलाव करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार असतो.
News Source: https://www.majhagaav.com