Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving in FY24: नव्या आर्थिक वर्षात कर बचतीचे नोकरदारांपुढील पर्याय कोणते?

Tax Saving in FY24

नोकरदाराला दरमहा पगार मिळतो. या पगारातून मासिक, वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबच भविष्यातील गुंतवणुकीचाही विचार करावा लागतो. उत्पन्नातून कमीत कमी कर कपात व्हावी याकडेही त्याचे लक्ष असते. विशेषत: उत्पन्न करपात्र झाल्यानंतर तर अनेकजण जागे होतात. नवं आर्थिक वर्ष पगारदारांसाठी पगारवाढही घेऊन येत असते. नव्या वर्षात कर बचतीसाठी काय पर्याय आहेत ते वाचा.

Tax Saving in FY24: नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दरमहा पगार मिळतो. या पगारातून मासिक, वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबच त्याला भविष्यातील गुंतवणुकीचाही विचार करावा लागतो. उत्पन्नातून कमीत कमी कर कपात व्हावी याकडेही त्याचे लक्ष असते. विशेषत: उत्पन्न करपात्र झाल्यानंतर तर अनेकजण जागे होतात. नवं आर्थिक वर्ष पगारदारांसाठी पगारवाढही घेऊन येत असते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10 लाखाचे पॅकेज असेल आणि त्याला 20 टक्के पगारवाढ मिळाली, तर त्याचा टॅक्स स्लॅबही वाढतो. यापेक्षाही जास्त पॅकेज असेल तर जास्त कर देण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नव्या वर्षात कर कमी करण्यासाठी काय पर्याय तुमच्यापुढे आहेत, ते पाहू!

पगाराची पुनर्रचना करून घ्या

अनेक कंपन्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्याला पगाराची पुनर्रचना करण्याची परवानगी देतात. जर तुमची कंपनीही अशी परवानगी देत असेल तर त्याचा फायदा घ्या. पगाराची पुनर्रचना करून कर वाचवता येऊ शकतो. टेलिफोन, इंटरनेट, इंधन, प्रवास, जेवणाचे कूपन्स, न्यूजपेपर यासह इतरही काही गोष्टींच्या बिलासाठी रिंबर्समेंट म्हणजेच पैसे माघारी मिळवू शकता.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात leave travel assistance (LTA) या अलाउन्सचा प्रभावी वापर कर्मचाऱ्यांना करता आला नाही. हा LTA अलाउन्स तुमच्या CTC म्हणजेच एकूण पगारामध्ये दाखवलेला असतो. तुमचा आणि कुटुबियांसोबत केलेला प्रवासावर करवजावट मिळू शकते. या रक्कमेवर तुम्ही बिल दाखवून CTC कमी दाखवू शकता. मात्र, त्यासाठी LTA आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच CTC मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. इनकम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही ही रक्कम क्लेम करू शकता.

NPS योजनेचा लाभ घ्या

NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन योजना. आयकर कायद्यातील 80CCD(2) काही कंपन्या बेसिक पगारातील 10% पर्यंतची रक्कम NPS खात्यात जमा करतात. मात्र, हा पर्याय कर्मचाऱ्याला आधी निवडावा लागतो. अनेक कर्मचारी या सुविधेचा लाभ घेत नाहीत. त्या पर्यायाद्वारेही तुम्ही कर वाचवू शकता. पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) आणि प्रोविडंट फंड (PF) पेक्षा NPS हा निवृत्ती नियोजनासाठी चांगला पर्याय आहे. परतावा देणाऱ्या विमा योजनांपेक्षाही NPS चांगली ठरू शकते. NPS मध्ये केलेली गुंतवणूक तुम्ही निवृत्तीच्या वेळी 60% काढू शकता. ही रक्कम करमुक्त असेल. तसेच उर्वरित 40% रक्कम तुम्हाला निवृत्तीनंतर वार्षिक परताव्याच्या रुपाने मिळेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना जास्त फायदेशीर ठरू शकते.

Section 80 CCD(1) नुसार तुम्ही किंवा तुमच्या वतीने कंपनी NPS खात्यामध्ये पैसे भरत असेल तर दीड लाखांपर्यंत करपात्र उत्पन्नावर करवजावट मिळवता येईल. सोबतच 80CCD(1b) नुसार अतिरिक्त 50 हजार रुपायांवरही तुम्ही कर वजावट मिळवू शकता.

कर बचत करणाऱ्या पर्यायांमधील गुंतवणूक

कर बचतीसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत वाट पाहू नका. फेब्रुवारी मार्च महिन्यात दरवर्षी एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी वाढते. मात्र, तसे न करता नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक सुरू करा. ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एप्रिल महिन्यापासूनच एसआयपी सुरू करा. दरमहा गुंतवणूक करुन विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करुन जोखीम कमी करू शकता. मात्र, वर्षाच्या शेवटी एकरकमी गुंतवणूक करून जोखीम वाढू शकते. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात कराल तेवढा चक्रवाढ व्याजाच्या दराने तुमची गुंतवणूक मोठी होत जाईल.

Form 15G आणि 15H भरा

जर तुम्ही बँकेमध्ये मुदत ठेव ठेवली असेल आणि त्यावर मिळणारे व्याज 40 हजार रुपायांपेक्षा जास्त असेल तर बँक टीडीएस कापते. मात्र, जर तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही Form 15G आणि 15H भरून टीडीएस वाचवू शकता. मात्र, आधी खात्री करा की तुमचे उत्पन्न करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे. अन्यथा तुम्हाला प्राप्तिकर खात्याकडून दंड केला जाऊ शकतो.