Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honda Activa Smart: होंडाची नवीन स्मार्ट एक्टिवा स्कूटर 23 जानेवारीला होणार लाँच, माहित करून घ्या फीचर्स

Honda Activa Smart

Image Source : http://autos.maxabout.com/

Honda Activa Smart: Honda Activa ही स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे आणि आता कंपनी ती नवीन लुकसह लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेल 23 जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Honda Activa Smart: Honda Activa ही स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे आणि आता कंपनी ती नवीन लुकसह लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेल 23 जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे. Honda Activa स्मार्ट स्कूटरचे डिटेनवीन Activa त्याच्या नियमित मॉडेलप्रमाणेच 110cc इंजिनसह येईल. जे 7.79PS चा पॉवर देऊ शकते. जाणून घेऊया अधिक माहिती.. 

Honda Activa Smart चे वजन किती असणार? (What will be the weight of Honda Activa Smart?)

नवीन अ‍ॅक्टिव्हा स्मार्ट आणि 'एच-स्मार्ट' टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात येणार आहे. Honda Activa Smart चे एकूण वाहन वजन (GVW) 279 kg आहे. हे Activa STD आणि DLX प्रकारांपेक्षा 1 किलो कमी आहे. या स्कूटरची लांबी 1833 मिमी, रुंदी 697 मिमी आणि उंची 1156 मिमी असेल. आणि त्याचा व्हीलबेस 1260mm आहे. नवीन मॉडेलची किंमत वाढणार आहे.

Honda Activa Smart कोणाशी स्पर्धा करणार? (Who will Honda Activa Smart compete with?)

ही नवीन Honda स्कूटर TVS ज्युपिटरशी स्पर्धा करेल, ज्याची सुरुवातीची किंमत 73,097 आहे आणि तिचे टॉप मॉडेल  87,923 च्या किमतीत उपलब्ध आहे. त्याचे 6 प्रकार आणि 16 कलर ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत. TVS ज्युपिटरमध्ये 109.7cc BS6 इंजिन आहे, जे 7.77 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम मिळते. या स्कूटरचे वजन 107 किलो आहे आणि त्याची इंधन टाकी क्षमता 6 लीटर आहे.

Honda Activa Smart काय असणार नवीन? (What will be the new Honda Activa Smart?)

 होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टीम किंवा H.I.S.S ची परवडणारी सिरिज असू शकते, जी कंपनीच्या एक्सपेनसीव बाइकमध्ये आढळते. यात नवीन अँटी थेफ्ट सिस्टम आहे.  ही स्कूटर शाईन सारख्या इतर होंडा बाईकच्या रेंजमध्ये सामील होऊ शकते.