Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honda Price Hike: होंडा कंपनीच्या कारही महागणार, 'ही' आहेत कारणे

Honda Price Hike

होंडा कंपनी जपानची कार निर्मिती कंपनी असून विविध श्रेणीतील गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढवणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, मर्सडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट सह इतर कारनिर्मिती कंपन्यांनी नूतन वर्षात कारच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, मर्सडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट सह इतर कारनिर्मिती कंपन्यांनी नूतन वर्षात कारच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता होंडा कंपनीनेही (Honda Price Hike) किंमत वाढीचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. सर्वच गाड्यांच्या किंमती नव्या वर्षात वाढणार असल्याने डिसेंबर महिना संपायच्या आत गाडी घेतल्यास ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. अन्यथा पुढील वर्षी नवीन गाडी खरेदी करायची असल्यास जास्त पैसे देण्याची मानसिक तयारी आतापासूनच ठेवा. 

होंडा कंपनी जपानची कार निर्मिती कंपनी असून विविध श्रेणीतील गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढवणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. किया, जनरल मोटर्स कंपनीनेही पुढील वर्षीपासून किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. 

किंमत वाढवण्यामागील कारणे (Reason behind car price hike) 

कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून पुढील वर्षीपासून प्रदूषणाबाबत  सरकारचे अधिक कठोर निर्बंध लागू होणार आहेत. पुढील वर्षी सरकार BS-6 नियमवाली लागू करणार आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना अधिकचा खर्च येईल, हे किंमत वाढीमागील एक महत्त्वाचे कारण आहे. होंडा कंपनीचे मार्किटिंग आणि विक्री विभागाचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले की, कार निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतींचा आम्ही आढावा घेतला. तसेच येत्या काळात सरकारच्या नियमावलीचा विचार करता जानेवारीपासून गाड्यांच्या किंमतीमध्ये सुधारणा करावी लागेल. वेगवेगळ्या कार मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 30 हजार रुपयांपर्यंत बदल होतील.  

BS-6 नियमावलीचा दुसरा टप्पा (Stringent BS-6 regulation for car manufacturer) 

वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी BS-6 नियमावलीचा दुसरा टप्पा एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. गाडी चालवताना किती प्रदूषण होत आहे याचे मापन करण्यासाठी 'सेल्फ डायगनॉस्टिक डिव्हाइस' गाडीमध्ये बसवने अनिवार्य असणार आहे. त्यामुळे वाहनातून ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण तर होत नाही ना, याची अचूक माहिती मिळेल. या उपकरणाद्वारे गाडीच्या विविध पार्ट्ची गुणवत्ता तपासण्यात येईल. इंजिनमध्ये किती पेट्रोल जाते हे तपासण्यासाठी 'प्रोग्रॅम्ड फ्युअल इंजेक्टर' गाडीमध्ये बसवण्यात येणार आहे. प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी गाडीमध्ये अपग्रेडेड सेमिकंडक्टर देखील बसवण्यात येणार आहे. या सर्व उपकरणांचा खर्च सहाजिकच कंपनी कारच्या किंमतीमध्ये समाविष्ट करेल