Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Honda Activa: विश्वास नाही बसणार! लांबूनच स्कूटी स्टार्ट करू शकता; कारमधील अनेक फिचर्स आता अॅक्टिवातही

New Honda Activa

होंडा कंपनीची अॅक्टिवा स्कूटी भारतात चांगलीच प्रसिद्ध आहे. स्कूटी म्हणजेच अॅक्टिवा एवढं मोठं नाव या ब्रँडचं भारतीय बाजारात आहे. होंडा कंपनीने आज अॅक्टिवा स्कूटीचे तीन नवीन मॉडेल लाँच केली आहेत. या स्कूटीमध्ये कंपनीने कारमध्ये असतात तशी काही फिचर्स दिली आहेत. त्यामुळे या नवीन मॉडेलचे मार्केटमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे.

होंडा कंपनीची अॅक्टिवा स्कूटी भारतात चांगलीच प्रसिद्ध आहे. स्कूटर म्हणजेच अॅक्टिवा एवढं मोठं नाव या ब्रँडचं भारतीय बाजारात आहे. होंडा कंपनीने आज अॅक्टिवा स्कूटीचे तीन नवीन मॉडेल लाँच केली आहेत. या स्कूटीमध्ये कंपनीने कारमध्ये असतात तशी काही फिचर्स दिली आहेत. त्यामुळे या नवीन मॉडेलचे मार्केटमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. Activa H-Smart या नावाने कंपनीने ही नवीन मॉडेल्स लाँच केली असून 74,536 रुपयांपासून स्कूटीची किंमत आहे.

कारमधील फिचर्स स्कूटीमध्ये (Car like Features in Honda Activa)

होंडा कंपनीने स्कूटीसोबत स्मार्ट की ( स्मार्ट चावी) दिली आहे. तसेच पाच नवीन पेटंटेड फिचर्स या गाडीत दिली आहेत. स्मार्ट की मुळे गाडी कुठे पार्क केली आहे, हे गाडी मालकाला सहज समजणार आहे. अॅक्टिव्हा 6G स्मार्ट की मध्ये स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट, स्मार्ट फाइंड आणि स्मार्ट सेफ असे चार फिचर्स देण्यात आली आहेत. स्मार्ट लॉक-अनलॉक फिचर्समुळे वाहन मालकाला गाडीचे हँडलबार्स, स्टोरेज सेक्शन आणि फ्युअल टँक स्मार्ट चावीने लॉक-अनलॉक करता येणार आहे. 

स्मार्ट फाइंड फिचर( Honda Activa Smart find feature)

बऱ्याच वेळा पार्किंगमध्ये अनेक गाड्या असल्याने गाडी कुठे लावली आहे हे समजत नाही. त्यामुळे कंपनीने विचारपूर्वक स्मार्ट फाइंड फिचर चावीमध्ये दिले आहे. त्यामुळे गाडी शोधणे सोपे होणार आहे. गाडीला फिजिकली चावी न लावता गाडी लॉक-अनलॉकही करता येणार आहे. गाडीपासून 2 मीटर लांब राहूनही चावीने गाडी ऑटो स्टार्ट करता येणार आहे. तसेच गाडीला इंजिन ऑन-ऑफ बटण देण्यात आले आहे.

होंडा अॅक्टिवा स्मार्ट किंमत( Honda Activa H-Smart price range)

Honda Activa H-Smart गाडी स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. या तिन्ही गाड्यांची किंमत अनुक्रमे 74,536, 77,036 आणि 80,537 रुपये एवढी असणार आहे. या गाडीत पाच नवीन पेटंटेड फिचर्स दिली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

गाडी चालवताना किती उत्सर्जन होत आहे, हे रियल टाइम समजण्यासाठी board diagnostics (OBD 2) हा डिव्हाइस गाडीला बसवणे अनिवार्य असणार आहे. एप्रिलपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक नवे नियम वाहननिर्मिती कंपन्यांना लागू करण्यात आले आहेत. याशिवाय गाडीमध्ये नवीन एलॉय व्हिल्स, एलईडी हेडलँम्प लाइट, पासिंग स्वीच आणि फूटबार्ड एरिया जास्त देण्यात आला आहे. होंडा स्कूटी विक्रीमध्ये आघाडीवर असून 56 टक्के कंपनीचा मार्केट शेअर आहे.