Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan : अ‍ॅलॉटमेंट लेटर म्हणजे काय? होम लोनसाठी ते किती गरजेचे आहे

Home Loan : अ‍ॅलॉटमेंट लेटर म्हणजे काय? होम लोनसाठी ते किती गरजेचे आहे

Image Source : www.piramalrealty.com

बांधकाम व्यावसायिक किंवा गृहनिर्माण प्राधिकरण घराच्या पहिल्या खरेदीदाराला अ‍ॅलॉटमेंट लेटर (Allotment letter) देत असतात. ज्यामध्ये घर, प्लॉट किंवा फ्लॅट यांसारख्या कोणत्याही मालमत्तेचा संपूर्ण तपशील असतो. जसे की मालमत्तेचे क्षेत्रफळ, स्थान देय रकमेचा तपशील, तारीख बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीची माहिती इत्यादी तपशीलाचा समावेश असतो.

Allotment letter : गृहकर्ज (Home loan) देण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते. तुम्ही दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवते. त्याचप्रमाणे गृहकर्ज घेण्यासाठी अ‍ॅलॉटमेंट लेटर (Allotment letter) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. याला वाटप पत्र किंवा ताबा पत्र देखील संबोधले जाते. गृहकर्जाची रक्कमही यावर अवलंबून असते.  दरम्यान, अ‍ॅलॉटमेंट लेटर म्हणजे काय आणि गृहकर्ज घेण्यासाठी ते का आवश्यक आहे? ते आपण समजून घेऊया?

वाटप पत्र म्हणजे काय? Allotment letter

बांधकाम व्यावसायिक किंवा गृहनिर्माण प्राधिकरण घराच्या पहिल्या खरेदीदाराला अ‍ॅलॉटमेंट  लेटर (Allotment letter) देत असतात. ज्यामध्ये घर, प्लॉट किंवा फ्लॅट यांसारख्या कोणत्याही मालमत्तेचा संपूर्ण तपशील असतो. जसे की मालमत्तेचे क्षेत्रफळ,स्थान देय रक्कमेचा तपशील, तारीख इत्यादी तपशीलाचा समावेश असतो. अ‍ॅलॉटमेंट लेटर हा गृहनिर्माण संस्था, रिअल इस्टेट डेव्हलपर किंवा प्राधिकरणाने मालमत्ता युनिट किंवा भूखंड वाटप केलेल्या व्यक्तीला जारी केलेला कायदेशीर दस्तऐवज आहे. हे अर्जदारास विशिष्ट मालमत्तेच्या वाटपाचे अधिकृत प्रमाणीकरण म्हणून कार्य करते. कोणताही बिल्डर किंवा गृहनिर्माण प्राधिकरणाद्वारे  वाटप पत्र अ‍ॅलॉटमेंट लेटर दिले जाते.

गृहकर्जासाठी वाटप पत्राचे महत्त्व?

बँकेकडून गृहकर्ज (Home Loan) मिळविण्यासाठी वाटप पत्र महत्वाचे आहे. कारण पत्रात तुम्हाला बिल्डर/हाऊसिंग सोसायटीला किती पैसे द्यावे लागतील याचा उल्लेख असतो. जेणेकरून उर्वरित रक्कम बँकेद्वारे वित्तपुरवठा करता येईल. या पत्राच्या आधारे बँक उर्वरित रकमेची आर्थिक मदत करते.वाटप पत्र मालमत्तेच्या मालकीचा किंवा संबंधित व्यक्तीच्या ताब्यात असल्याचा पुरावा म्हणून काम करते. मालमत्तेची कायदेशीर स्थिती सत्यापित करण्यासाठी आणि कर्जदाराचा त्यावर वैध दावा असल्याची खात्री करण्यासाठी बँकेला या दस्तऐवजाची आवश्यकता असते.

कर्ज पात्रता मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वाचे-

वाटप पत्र मालमत्तेचा आकार, स्थान आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल तपशील देते. मालमत्तेच्या मूल्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कर्जदार ज्यासाठी पात्र आहे त्या कर्जाची रक्कम ठरवण्यासाठी हे तपशील सावकारांसाठी महत्त्वाचे आहेत. तसेच वाटप पत्रात  बिल्डर अथवा बांधकाम कंपनीचे नाव, त्यांच्याकडील अधिकृत भांडवलाची रक्कम, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, कंपनीचा नोंदणी क्रमांक, खरेदीदाराचे नाव, देयक रकमेचा तपशील, बांधकाम परिस्थिती, बांधकामातील सुविधा, वितरण तारीख याचा तपशील उपलब्ध असतो. तसेच बँकेला गृह कर्ज मंजूर करत असताना किती वित्तपुरवठा करायचा आहे याची माहिती मिळते.