Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अशी करा म्युच्युअल फंडची E-KYC

अशी करा म्युच्युअल फंडची E-KYC

ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे करा E-KYC

KYC (Know your Customer) ही ग्राहकाची ओळख जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ती आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला गुंतवणूक करता येणार नाही. फसवणूक करणाऱ्या लोकांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सेबीने (Stock Exchange Board of India) म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी हे बंधनकारक केले आहे.

सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या खालीलपैकी कोणत्याही एजंटद्वारे ईकेवायसी प्रक्रिया केली जाऊ शकते,
1. फंड हाउस (अॅसेट मॅनेजमेंट कंपनी - AMC)
2. KYC नोंदणी एजन्सी जसे की, CAMS, KARVY, CDSL, NSDL आणि NSE

केवायसी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पूर्ण केली जाऊ शकते.

म्युच्युअल फंड KYC करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

टप्पा 1: कोणत्याही फंड हाऊसच्या वेबसाइटला किंवा वर नमूद केलेल्या KRA वेबसाइटला भेट द्या. त्यावर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमचे खाते तयार करा. त्यात आधारला लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. ओटीपी टाकून खात्याची खात्री करा.

टप्पा 2: तुमच्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची स्व-प्रमाणित प्रत अपलोड करा. की तुमचे केवायसी पूर्ण होईल.

म्युच्युअल फंड KYC करण्याची ऑफलाईन प्रक्रिया

टप्पा 1: फंड हाऊस किंवा कोणत्याही KRA कंपनीच्या शाखेला भेट द्या.
टप्पा 2: KYC फॉर्म भरून तुमची ओळख आणि पत्ता पुरावा द्या.

KYC पूर्ण झाली की नाही असे तपासा
तुम्ही वरीलपैकी कोणत्याही KRA संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे तुमचा पॅन क्रमांक टाकून KYC ची स्थिती तपासा.

KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मनरेगा कार्ड
  • पासपोर्टसाईज फोटो