नुकतीच जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. यात अमेरिकेतील स्वकर्तुत्वावर यशस्वी उद्योजक बनलेल्या महिलांच्या यादीत एका मराठमोळ्या मुलीचं नाव आहे. ही मुलगी आहे नेहा नारखेडे. नेहा यांचं मूळ गाव पुणे. शिक्षणासाठी नेहा यांनी अमेरिका गाठली आणि त्याच अमेरिकेत स्वतःच्या हिमतीवर कंपनी सुरु केली असून आज त्या 520 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 42 हजार कोटी रुपयांच्या मालकीण बनल्या आहेत. ही केवळ महाराष्ट्रातील लोकांच्याच नाही तर देशभरातील नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या America's Self-Made Women (2023) या श्रेणीत सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नेहा यांचा 50 वा क्रमांक आहे. आज तंत्रज्ञान जगातील सर्वात यशस्वी महिलांमध्ये नेहाची गणना होते आहे.
नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती 520 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 42 हजार कोटी रुपये इतकी आहे. नेहा यांनी वेगवगेळ्या कंपन्यांमध्ये काम केले असून त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ‘कॉन्फ्लुएंट’ नावाची स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी क्लाउड सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचे एकूण मूल्य 9.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 75 हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या कंपनीची नेहा सह-संस्थापक असून डायरेक्टर देखील आहे. या कंपनीत नेहा नारखेडे यांचीव 6% हिस्सेदारी आहे.
Indian-Americans Jayshree Ullal, Neerja Sethi, Neha Narkhede, and Indra Nooyi feature in the ninth Forbes’ Richest Self-Made Women list of 2023. pic.twitter.com/VlqJX8xKK7
— IANS (@ians_india) July 10, 2023
असा आहे नेहा यांचा प्रवास!
नेहा या मुळच्या पुण्याच्या. त्यांचे आईवडील पुण्यातच राहतात. त्यांचे शालेय शिक्षण आणि पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले.नेहा यांनी एससीटीआरएस पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) कॉलेज, पुणे येथून इंजिनीअरिंग केले. 2006 साली मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत गेल्या. तिथे त्यांनी दोन वर्षे ‘ओरॅकल’ या सॉफ्टवेअर कंपनीत 2008-2010 या कालावधीत काम केले. त्यांनतर 2011 साली त्या ‘लिंक्डइन’मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रुजू झाल्या. वर्षभरातच त्या लिंक्डइनच्या प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम सांभाळू लागल्या. पुढे त्या LinkedIn च्या स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लीड देखील बनल्या.
सुरु केली स्वतःची कंपनी!
2014 साली लिंक्डइनच्या स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लीड पदाचा नेहा यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत त्यांनी कॉन्फ्लुएंट (Confluent) नावाने एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली असून ही कंपनी डेटा व्यवस्थापनावर (Data Managemnet) काम करते. 2021 साली नेहा यांनी ऑसिलर (Oscilar Inc) नावाची आणखी एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली आहे.