Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NFO Investment: एचडीएफसीचा टेक्नॉलॉजी फंड लॉन्च; गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या

HDFC Technology Fund NFO

Image Source : www.economictimes.indiatimes.com/www.commons.wikimedia.org

HDFC NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) HDFC Technology Fund लॉन्च केला आहे. हा एनएफओ 5 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

HDFC NFO Investment: एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने ओपन एंडेड इक्विटी स्कीममधील एचडीएफसी टेक्नॉलॉजी फंड (HDFC Technology Fund) लॉन्च केला आहे. या फंडमध्ये जमा होणारा निधी हा टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. गुंतवणूकदारांना 5 सप्टेंबरपर्यंत यामध्ये एनएफओ (New Fund Offer-NFO) म्हणून गुंतवणूक करता येणार आहे.

एचडीएफसी टेक्नॉलॉजी फंडमध्ये विशेष काय आहे?

एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने लॉन्च केलेला हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. यामध्ये जमा होणारा निधी कंपनी टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. त्यामुळे जे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एखाद्या प्लॅनचा विचार करत आहेत. त्यांच्यासाठी हा फंड फायद्याचा ठरू शकतो. तसेच ज्यांना थेट टेक्नॉलॉजी कंपन्यांचे शेअर्स घेणे परवडत नाही किंवा शेअर्स घेण्याची रिस्क वाटत आहे. त्यांच्यासाठी हा फंड योग्य ठरू शकतो.

एनएफओ म्हणजे काय?

जेव्हा म्युच्युअल फंड कंपनी बाजारात पहिल्यांदा फंड ऑफर करतो तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर म्हणजेच एनएफओ (New Fund Offers-NFO) म्हणतात. म्युच्युअल फंड कंपन्या बाजारातून पैसे गोळा करण्याच्या हेतूने, नवीन फंडची ऑफर आणतात. या व्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना नवीन फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर देखील दिली जाते.

किमान गुंतवणूक किती करावी लागते?

एचडीएफसी टेक्नॉलॉजी फंडमध्ये गुंतवणूकदार किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात आणि जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

या फंडमधील गुंतवणुकीचे प्रमाण कसे असणार आहे?

एचडीएफसी टेक्नॉलॉजी फंडमध्ये जमा होणाऱ्या एकूण निधी पैकी जास्तीत जास्त म्हणजे 100 टक्के आणि कमाल म्हणजे 80 टक्के निधी हा इक्विटी, टेक्नॉलॉजी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. यामध्ये जोखीमीचा भाग मोठा असणार आहे.

टेक्नॉलॉजीशी संबंधित अजून कोणते फंड आहेत का?

म्युच्युअल फंड मार्केटमध्ये सध्या 4 प्रकारच्या फंड हाऊसचे टेक्नॉलॉजीशी संबंधित स्कीम्स आहेत. यामध्ये फ्रॅन्कलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंड हाऊसचा Franklin India Technology Fund, एसबीआय म्युच्युअल फंडचा SBI Technology Opporunities Fund, आयसीआयसीआय प्रुडेन्टिशिअल म्युच्युअल फंडचा ICICI Prudential Technology Fund आणि क्वॉन्ट म्युच्युअल फंडचा Quant Teck Fund उपलब्ध आहे.  

या स्कीमवर एन्ट्री आणि एक्झिट लोड आहे का?

या फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणताही एन्ट्री लोड आकारला जात नाही. पण त्यातून 1 वर्षाच्या आत बाहेर पडताना गुंतवणूदारांना 1 टक्के एक्झिट लोड द्यावा लागणार. 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांच्या गुंतवणुकीवर एक्झिट लोड लागत नाही. दरम्यान, या फंडची जबाबदारी फंड मॅनेजर म्हणून बालाकुमार बी आणि ध्रुव मुच्छल यांच्यावर आहे.