Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Investment: एचडीएफसीने रुरलशोर्स कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकून 'या' दोन कंपन्यांमध्ये केली गुंतवणूक

HDFC Investment

HDFC Investment: एचडीएफसीने गुरुवारी 22 जून 2023 रोजी शेअर मार्केटमधील बोनिटो डिझाईन (Bonito Design) आणि रिलाटा (Relata) कंपनीत गुंतवणूक केली आहे. तर रुरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड (Ruralshores Business Pvt Ltd) कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकली आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) रूरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड (Ruralshores Business Pvt Ltd) कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. या कंपनीत एचडीएफसीची एकूण 9.65 टक्के भागीदारी होती. गुरुवारी 22 जून 2023 ला शेअर मार्केटमध्ये दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसीने रूरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील आपली संपूर्ण भागीदारी विकली आहे. तर होम इंटेरिअर ब्रँड 'बोनिटो डिझाईन' (Bonito Design) आणि रिअल इस्टेट कंपन्यांना टेक सोल्युशन पुरवणारी 'कॉग्निलीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' (Cogniliments Private Limited) कंपनीमध्ये एचडीएफसीने गुंतवणूक केली आहे. कॉग्निलीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रिलाटा (Relata) नावाने देखील ओळखले जाते. एचडीएफसीने कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक केली आहे, जाणून घेऊयात.

'या' कंपनीतील भागीदारी विकली

रूरलशोर्स ही एक बिजनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग कंपनी आहे. या कंपनीने शेअरधारकांसाठी बायबॅक ऑफर घोषित केली होती. याच ऑफर अंतर्गत एचडीएफसीने आपली संपूर्ण भागीदारी विकली आहे. एचडीएफसीजवळ रूरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेडचे 2,66,351 इक्विटी शेअर्स होते. ज्याची जवळपास 9.65 टक्के भागीदारी एचडीएफसीकडे होती.

कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक केली?

एचडीएफसीने (HDFC) बाजारातील तेजी लक्षात घेऊन दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. एचडीएफसीने  होम इंटेरिअर ब्रँड 'बोनिटो डिझाईन' (Bonito Design) आणि रिअल इस्टेट कंपन्यांना टेक सोल्युशन पुरवणारी 'कॉग्निलीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' (Cogniliments Private Limited) कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. कॉग्निलीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रिलाटा (Relata) नावाने देखील ओळखले जाते.

एचडीएफसीने बोनिटो डिझाईन कंपनीत 6,068 इक्विटी शेअर्सची खरेदी केली आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनीतील 3.86 टक्के भागीदारी आणि 5.13 टक्के वोटिंग राईट्स एचडीएफसीला मिळणार आहेत. एचडीएफसीने बोनिटो सोबत केलेली ही डील पूर्णतः कॅश व्यवहारात केली आहे. कंपनीने 41,196 रुपये प्रति शेअर्स दराने शेअर्स खरेदी केले आहेत. या मार्गाने कंपनीने एकूण 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तसेच कॉग्निलीमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एचडीएफसीने आपली उपकंपनी एचडीएफसी कॅपिटल ऍडव्हायजर्स लिमिटेडच्या (HDFC Capital Advisors Limited) माध्यमातून गुंतवणूक केली आहे. एचडीएफसीने रिलाटामध्ये 914 CCPS मिळवण्यासाठी करार केला आहे.कंपनीने हे शेअर्स 21,872 रुपये प्रति शेअर्स दराने खरेदी केले आहेत. ज्यामुळे 4 ते 7 टक्के भागीदारी एचडीएफसीकडे राहणार आहे.

एचडीएफसीच्या शेअर्सवर काय परिणाम झाला?

या दरम्यान, एचडीएफसीचे शेअर्स गुरुवारी NSE वर 0.57 टक्के वाढून 2,717.40 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 0.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात एचडीएफसीच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे 25.56 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Source: hindi.moneycontrol.com