Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF form D : तुम्हीही पीपीएफ खातं उघडलं आहे? काय आहे फॉर्म डी? जाणून घ्या सविस्तर...

PPF form D : तुम्हीही पीपीएफ खातं उघडलं आहे? काय आहे फॉर्म डी? जाणून घ्या सविस्तर...

PPF form D : पीपीएफचं अकाउंट तुम्ही उघडलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच्या पर्यायांमध्ये पीपीएफ वरच्या स्थानी आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचं हे एक चांगलं माध्यम आहे. यात फॉर्म डीदेखील कसा महत्त्वाचा आहे, त्याविषयीदेखील माहिती असणं गरजेचं आहे.

छोट्या बचत योजनांचा (Small saving schemes) विचार केल्यास सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हे असं खातं आहे, ज्यावर अनेक फायदे उपलब्ध आहेत. पीपीएफ खातं हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हमखास परतावा देणारं एक प्रभावी माध्यम आहे. यामध्ये तुमच्या पैशाला चक्रवाढीचं एक बळ मिळतं. त्यासोबतच गुंतवणुकीपासून ते मॅच्युरिटीची आणि व्याजाची (Interest) रक्कम देखील करमुक्त राहते. म्हणजेच करबचतीच्या (Tax saving) दृष्टीनंदेखील हा एक उत्तम पर्याय आहे.

गरजेनुसार कर्ज घेण्याची सुविधा

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं नियुक्त बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येतं. या खात्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही गरजेनुसार स्वस्त आणि सुलभ कर्जदेखील घेऊ शकता. खातं उघडल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर पीपीएफ खात्यावर कर्ज मिळू शकतं. जसं की समजा तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23मध्ये खातं उघडलं असेल, तर तुम्ही 2023-24मध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. खात्याची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे.

पीपीएफचे विविध फॉर्म्स

  • फॉर्म A: पीपीएफ खातं उघडण्यासाठी (PPF ओपनिंग फॉर्म)
  • फॉर्म B: पीपीएफ खात्यात योगदान देण्यासाठी आणि खात्यावरच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी
  • फॉर्म C: पीपीएफ खात्यातून आंशिक पैसे काढण्यासाठी
  • फॉर्म D: पीपीएफ ठेवींवर कर्जासाठी अर्ज करण्यासाठी
  • फॉर्म E: पीपीएफ खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी
  • फॉर्म F: पीपीएफ खात्याचं नामांकन बदलण्यासाठी
  • फॉर्म G: नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाद्वारे निधीचा दावा करण्यासाठी
  • फॉर्म H: पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी वाढवण्यासाठी

फॉर्म डी आवश्यक

पीपीएफ खात्यावर कर्ज घ्यायचं असेल तर खातेधारकाला फॉर्म डी भरणं त्याचबरोबर सबमिट करणं गरजेचं आहे. त्यात खाते क्रमांक, कर्जाची रक्कम आणि खातेदाराची स्वाक्षरी असायला हवी. यासोबतच पीपीएफ खात्याचं पासबुकही जोडावं लागणार आहे. यानंतर ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस शाखेत तुमचं पीपीएफ खातं असेल, त्याठिकाणी जमा करावं लागणार आहे. थोडक्यात, पीपीएफच्या रकमेवर फॉर्म डीनुसार कर्ज मिळणार आहे.

किती कर्ज?

पीपीएफ खातं असेल तर कर्जदेखील मिळू शकतं. त्यासाठी फॉर्म डीची व्यवस्था आहे. नियमांनुसार, तुम्ही तुमच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी तुमच्या पीपीएफ खात्यातल्या शिल्लक रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळवू शकता. उदाहरणासह पाहू. जर तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23मध्ये कर्जासाठी अर्ज केला असेल तर 31 मार्च 2021पर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यातल्या शिल्लक रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं.

व्याजाचा दर

पीपीएफ खात्यावर घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते. या कर्जावर वार्षिक 1 टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध होईल. हे अल्प मुदतीचं कर्ज आहे. हे कर्ज 36 महिने पूर्ण होण्यापूर्वी फेडावं लागणार आहे. तुम्ही 36 महिन्यांनंतर परतफेड केल्यास, कर्ज वाटपाच्या तारखेपासून वार्षिक 6 टक्के व्याज भरावं लागेल.