येत्या 15 ऑगस्टला आपण सगळे भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. 2022 प्रमाणे या वर्षीही केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवला जावा हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशभरातील नागरिकांना राष्ट्रध्वज पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने भारतीय टपाल विभागाकडे सोपवली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील आता चांगल्या गुणवत्तेचा आणि सरकारमान्य ध्वज त्यांच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करता येणार आहे.
हर घर तिरंगा अभियान
‘हर घर तिरंगा अभियान’ 13 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित केले जाणार आहे. या कालावधीत नागरिक आपल्या घरांवर, कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवू शकणार आहेत. या अभियानात सामील होताना नागरिकांना ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार आहे. नागरिकांना त्यांच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज खरेदी करता येतील. देशभरातील 1.6 लाख टपाल कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Department of Posts here has launched the annual ‘Har Ghar Tiranga’ campaign 2.0 for #IndependenceDay2023, an official said.
— IANS (@ians_india) August 2, 2023
The initiative was kick-started last year to mark the #AmritMahotsav of India’s Independence and elicited a huge response from the people. pic.twitter.com/uNfgrE7qlB
कुठे खरेदी करता येणार राष्ट्रध्वज?
इंडियन पोस्टच्या देशभरातील 1.6 लाख पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वजांची विक्री लवकरच सुरू होणार आहे. टपाल विभागाला केंद्र सरकारने तशा सूचना दिल्या असून, त्याबाबत सध्या कारवाई सुरु आहे. याशिवाय सध्या टपाल विभागाच्या ई-पोस्ट ऑफिस सुविधेद्वारे (www.epostoffice.gov.in) देखील नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करता येणार आहे.
इंडियन पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटनुसार ‘हर घर तिरंगा 2.0’ अंतर्गत भारताचा राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.पोस्टात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या राष्ट्रध्वजाचा आकार 20 इंच x 30 इंच इतका असेल. यात केवळ ध्वज दिला जाणार असून, त्यासाठीची काठी/खांब दिला जाणार नाहीये. या राष्ट्रध्वजाची विक्री किंमत 25 रुपये प्रति नग असणार आहे. यावर जीएसटी शुल्क आकारले जाणार नाहीये तसेच डिलिव्हरी शुल्क देखील आकारले जाणार नाहीये.
राष्ट्रध्वजाचा वापर करताना नागरिकांनी ध्वज संहितेतील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे असेही इंडियन पोस्टने म्हटले आहे आणि सोबत ध्वज संहिता देखील वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.