Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Rin Portal : 'किसान क्रेडिट कार्ड'धारकांसाठी वेब पोर्टल सुरू; अनुदानित कर्ज मिळवण्यास शेतकऱ्यांना होणार मदत

Kisan Rin Portal :  'किसान क्रेडिट कार्ड'धारकांसाठी वेब पोर्टल सुरू; अनुदानित कर्ज मिळवण्यास शेतकऱ्यांना होणार मदत

Image Source : www.fasalrin.gov.in

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज मिळवून देण्यासाठी सुरु केलेली किसान क्रेडिट कार्ड योजना आता सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 19 सप्टेंबर 2023 ला किसान कर्ज पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी किसान कर्ज पोर्टलची(Kisan Rin Portal) सुरुवात केली आहे

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून आता शेतकऱ्यांना सरकारच्या सर्व योजनांसह अनुदानित कर्जाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर केंद्रीय कृषी विभागाकडून किसान कर्ज पोर्टल (Kisan Rin Portal)ची सुरुवात करण्यात आली आहे. या पोर्टलचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे. याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

किसान कर्ज पोर्टल 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज मिळवून देण्यासाठी सुरु केलेली  किसान क्रेडिट कार्ड योजना आता सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 19 सप्टेंबर 2023 ला किसान कर्ज पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी किसान कर्ज पोर्टलची(Kisan Rin Portal) सुरुवात केली आहे. हे पोर्टल शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत अनुदानित कर्ज मिळवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. तसेच यावेळी सरकारकडून वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) हे पोर्टल देखील लॉन्च करण्यात आले आहे. तसेच या पोर्टलवर शेतकऱ्यांना कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज देणाऱ्या बँकांची यादी यासह इतर सर्व सुविधा एकत्र उपलब्ध होणार आहेत.

केसीसी योजनेतून व्याजदरामध्ये सवलत-

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. या कर्जासाठी बँकाकडून 7% व्याजदर आकारण्यात येतो. मात्र, जर  शेतकऱ्यांनी मुदतीच्या आतमध्ये या कर्जाची परतफेड केली तर त्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत 3 % व्याजाची सवलत अनुदान म्हणून प्राप्त होते. म्हणजे शेतकऱ्यांना केवळ 4% व्याजदर आकारला जाईल. यात 1 लाखापेक्षा जास्त कर्जासाठी जमीन तारण ठेवावी लागते. आता या कर्जासंबंधीची सर्व माहिती किसान कर्ज पोर्टल (Kisan Rin Portal)वर सहज उपलब्ध होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एकूण डेटा, यास केसीसी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानिक कर्जाची आणि वितरणाची माहिती, तसेच या कर्जासाठी आकारण्यात येणाऱ्या व्याज आणि इतर नियमांची माहिती उपलब्ध होणार आहे. 

घरो घरी केसीसी अभियान

किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने  घरो घरी केसीसी हे अभियान हाती घेतले आहे. या माध्यमातून सरकार KCC योजनेबाबत सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे अभियान 1 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.