BMC Recruitment: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. मुंबई महानगरपालिकेत शासकीय भरती निघणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीचे अधिकृत नोटिफिकेशन BMC च्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आदी गोष्टींचा सविस्तर तपशील प्रकाशित केला गेला आहे.
मुंबई महानगरपालिका संचालित विविध रुग्णालयात सहाय्यकारी परिचारिका प्रसविका म्हणजेच असिस्टंट नर्स मिडवाईफ पदासाठी ही भरती होणार आहे. या जागेसाठी तब्बल 412 रिक्त पदांची भरती होणार आहे. या जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी नर्सिंग तसेच जीएनएम (GNM) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. पदभरतीसाठी आवश्यक अर्हता प्रकाशित केलेली असून, योग्य उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
इतका असेल पगार!
असिस्टंट नर्स मिडवाईफ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार पर्यंत पगार दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
पदभरतीसाठी आवेदन सादर करताना दहावी, बारावीची प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारासाठी जातीचा दाखला, शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) तसेच पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक असणार आहे.