भारतात गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. देशोविदेशातील मोबाईल उत्पादक कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. भारतातील मोबाईल युजर्सची संख्या, आर्थिक उलाढाल आणि बाजारपेठ यांचा अंदाज लक्षात घेता येणाऱ्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल बघण्यास मिळणार आहेत. हाच अंदाज घेऊन सात वर्षापूर्वी पहिल्या इंडियन मोबाईल काँग्रेसचे (Indian Mobile Congress) आयोजन करण्यात आले होते. यंदा इंडियन मोबाईल काँग्रेसची 7 वी बैठक उद्यापासून दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होत आहे.
प्रधानमंत्री लावणार हजेरी
दिल्लीत होऊ घातलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थित शास्त्रज्ञांना, कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दूरसंचार विभाग (DoT) आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) द्वारे संयुक्त विद्यमाने 3 दिवस वेगवगेळ्या विषयवार चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमात 1 लाखाहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
Prime Minister #NarendraModi will inaugurate the 7th edition of the Indian Mobile Congress (IMC) 2023 on Friday morning at the Bharat Mandapam in Pragati Maidan.
— IANS (@ians_india) October 26, 2023
During the programme, Modi will award 100 ‘5G Use Case Labs’ to educational institutions across the country. pic.twitter.com/9pgSIyahYw
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशभरात आणि परदेशात कोणकोणते नवे प्रयोग सुरु आहेत, सरकारी योजनांचा लाभ मोबाईल उत्पादक कंपन्यांना कसा मिळतो आदी विषयांवर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. इंडियन तसेच 5G, 6G तंत्रज्ञान, ब्रॉडकास्टिंग सिस्टीम, सेमीकंडक्टर, ड्रोन उपकरणे आणि हरित तंत्रज्ञानासह (Green Technology) अनेक नवीन तंत्रज्ञानावर चर्चा केली जाईल
‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून Make in India आणि भारतीय स्टार्ट अप कंपन्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. भारतीय बनावटीचे स्मार्ट फोन भारतीयांनी खरेदी करावेत आणि इतर विदेशी कंपन्यांनी देखील भारतातच निर्मिती कारखाने काढावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
इंडियन मोबाईल काँग्रेसच्या या बैठकीत विविध सरकारी योजनांची माहिती तसेच नवीन योजनांची घोषणा देखील केली जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.