Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Govt Scheme for Girls: मुलींसाठी सरकारी योजना

Govt Schemes for Girls

Govt Scheme for Girls: मुली आणि महिलांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.

Govt Scheme for Girls in Maharashtra: महिला सबलीकरण (Women Empowerment) म्हटले की, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक होऊन जाते. महिला स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभ्या राहाव्यात. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मापासूनच त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत. ज्या योजनांच्या आधारे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद निर्माण करू शकतील.

महिला सक्षमीकरणामागील सरकारचा उद्देश (Government's objective behind women empowerment)

1. आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom)
2. मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे (Improve the Health Status of Girls)
3. मुलींचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे (To brings Positive Thoughts on Birth of Girls)
4. बालिका भ्रुणहत्या रोखणे (Prevention of Female Foeticide)
5.बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे (Stop Child Marriages)  
6.उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद (Financial Provision for Bright Future)
7. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे (Promote Girl Child Education)

एकूणच मुली आणि महिलांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे मुलींसाठी राबविल्या जाणाऱ्या सरकारी योजना

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana)

या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये 21,200/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये 1 लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येते. 
पात्रता: एक किंवा दोन मुलीवर मातापित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास
लाभ: 50,000 मुदत ठेव दोन मुली असल्यास दोघींच्या नावे 2,25,000 मुदत ठेव
संपर्क: अंगणवाडी, ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग

अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना (Ahilyadevi Holkar Mofat Pass Yojana)

या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता 12वी पर्यंतच्या विद्यार्थीनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेतून 100 टक्के सवलत दिली जाते.
पात्रता: इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या मुली
लाभ: लहान गट ते शाळा/कॉलेज मोफत पास
संपर्क: एसटी डेपो, एसटी महामंडळ, महाराष्ट्र सरकार

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना (Savitribai Phule Dattak - Palak Yojana)

पात्रता: इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या मुली
लाभ: वार्षिक 6 हजार रुपये शिष्यवृत्ती
संपर्क: शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा.

मोफत सायकल वाटप योजना (Mofat Cycle Vatap Yojana)

पात्रता: 5 वी ते 12 वीमध्ये शिकत असलेल्या मुली
घर ते शाळा अंतर 5 कि.मी असल्यास
लाभ: मोफत सायकल अथवा सायकल खरेदीसाठी अनुदान 
संपर्क: पंचायत समिती / समाज कल्याण विभाग

सुकन्या समुद्री योजना (Sukanya Samriddhi Yojana)

पात्रता: 0 ते 10 वयोगटातील मुली 
लाभ: 8.5% व्याजदर शिक्षणासाठी उपलब्ध. याशिवाय मुलीच्या 21 व्या वर्षी संपूर्ण रक्कम काढता येते 
संपर्क: पोस्ट ऑफिस / कोणतीही राष्ट्रीय बँक

जिजाऊ वस्तीगृह योजना (Jijau Vastigruh Yojana)

पात्रता: महाविद्यालयीन मुली / नोकरदार महिला
लाभ: वस्तीगृहात मोफत भोजन व इतर सुविधा
संपर्क: महिला व बाल विकास विभाग

अस्मिता योजना (Asmita Yojana)

पात्रता: किशोरवयीन मुली
लाभ: मोफत / अल्पदरात sanitary Napkin
संपर्क: अंगणवाडी / ग्रामपंचायत

उपस्थिती भत्ता (Upasthiti Bhatta Yojana)

पात्रता: BPL मुली / SC / ST मुली
लाभ: शालेय उपस्थितीनुसार 2 रुपये भत्ता
संपर्क: शाळा मुख्याध्यापक / गट शिक्षण अधिकारी

मोफत गणवेश वाटप योजना (Mofat Ganvesh Vatap Yojana)

पात्रता: सरकारी शाळेत 5 वी ते 8 वी इयत्ते शिकत असलेल्या मुली
लाभ: वार्षिक दोन गणवेश 
संपर्क: खरेदीसाठी अनुदान शिक्षण अधिकारी

स्वरक्षण कराटे, कुंग-फू क्लास (Self Defense karate, Kung-Fu Classes)

पात्रता: 5 वी ते 12 वी शिकत असलेल्या मुली
लाभ: मोफत स्वरक्षण शिक्षण
संपर्क: गट शिक्षण अधिकारी