Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Phone Discount: गुगल फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

Google Phone Discount: गुगल फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

Image Source : www.elgiganten.dk

सध्या फेस्टिव्हल सिझन सुरू असल्यामुळे सर्वच ई-कॉमर्स वेबसाईटवर आकर्षक सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन घ्यायच्या तयारीत असल्यास, गुगल पिक्सल 6a वर बपंर डिस्काउंट मिळवू शकता. चला तर किती डिस्काउंट मिळतोय, हे पाहूया.

Google Phone Discount: Google म्हटलं की विषय खल्लास. गुगलचा फोन त्याच्या फोटोच्या क्वालिटीसाठी ओळखला जातो. त्यामुळे तुम्हाला फोटोग्राफीची आवड असल्यास, तुम्ही या फोनला तुमचा सोबती बनवू शकता. कारण, फ्लिपकार्टवर या फोनसाठी घसघशीत ऑफर पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल फोन घेण्याचा निर्णय केला असल्यास, अर्ध्या किमतीत गुगल पिक्सल 6a घरी आणू शकता. गुगल फोनच्या किमती खूप महाग आहेत. त्यामुळे डिस्काउंटवर 6a मिळत असल्यामुळे संधी सोडू नका.

मिळवा अर्ध्यापेक्षा कमी किमतीत

तुम्ही गुगल पिक्सल 6a फोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर हा फोन बंपर डिस्काउंटवर घेता येणार आहे. तसेच, तुम्हाला यावर इतरही ऑफर घेता येणार आहेत. सध्या फ्लिपकार्ट वर या फोनची ओरिजनल किंमत 43,999 रुपये दाखवत आहे, मात्र, यावर मिळणाऱ्या डिस्काउंटमुळे हा फोन तुम्हाला फक्त 26,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तसेच, आधी सांगितल्यानुसार, तुम्ही जर बॅंकेच्या इतर ऑफर चेक केल्या तर त्यावरही तुम्हाला तगडा डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजेच हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरुन अर्ध्या किमतीपेक्षा ही कमी किमतीत घेऊ शकता. तसेच, हा फोन तुम्ही नो काॅस्ट ईएमआयवर देखील घेऊ शकता. पेमेंटसाठी तुम्ही कॅश ऑन डिलीव्हरी किंवा ऑनलाईनही पेमेंटचा पर्याय निवडू शकता.

फोनमधील फिचर्स आहेत जबरदस्त

फोनच्या फिचर्सविषयी बोलायचे झाल्यास, Google Pixel 6a ला 6.14 इंचांचा फुल  HD+ डिस्प्ले दिला आहे. फोनचे  रिझोल्युशन 1080x2400 पिक्सल आहे. तसेच, डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध करुन दिला आहे. तसेच, याला ड्युअल रियर कॅमेरा बसवण्यात आला आहे. यामध्ये 12.2 MP चा प्रायमरी कॅमेरा आहे तर याचा फ्रंट कॅमेरा 8 MP चा  आहे, म्हणजेच सेल्फी कॅमेरा. 

या फोनची सर्वात खास गोष्ट अशी आहे की यामध्ये मॅजिक इरेजर, आणि फेस अनब्लर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, फोनला 4410mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीचे फिचर्स फोनला देण्यात आले आहे. यामध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ यांचा समावेश आहे. फोनमध्ये 6 GB रॅम दिली आहे. याचबरोबर 128 GB ची रोमही मिळणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी किमतीमध्ये ब्रॅण्डचा फोन मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे हा फोन खरेदी केल्यास, तुमची फोटोग्राफीच हौस पूर्ण व्हायला नक्कीच मदत होणार आहे.