Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गुगल, मायक्रोसॉफ्टमध्ये स्पर्धा; चॅट जीपीटीला टक्कर देण्यास गुगल सज्ज

competition in Google and Microsoft

मायक्रोसॉफ्टच्या पायावर पाय ठेवत गुगल कंपनीनेही चॅट जीपीटी कंपनीच्या प्रतिस्पर्धी AI कंपनी Anthropic मध्ये चारशे मिलियन डॉलर रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांनी भविष्यातील प्लॅनबद्दल आणि या व्यवहारावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, माध्यमांतून ही माहिती पुढे आली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची उत्सुकता आणि भुरळ सर्वांनाच पडली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य, विमा, बँकिंग, पर्यटन, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रातील याचे अॅपलिकेशन समोर येत आहेत. त्यामुळे बलाढ्य आयटी कंपन्यांमध्ये या क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर असल्याचे कंपन्यांनी ओळखले असून त्यासाठी प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीने Open AI या कंपनीमध्ये 10 बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली होती.

मायक्रोसॉफ्ट, गुगलमध्ये स्पर्धा (competition in Google and Microsoft)

मायक्रोसॉफ्टच्या पायावर पाय ठेवत गुगल कंपनीनेही चॅट जीपीटी कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनी Anthropic मध्ये चारशे मिलियन डॉलर रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांनी भविष्यातील प्लॅनबद्दल आणि या व्यवहारावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, माध्यमांतून ही बातमी पुढे आली आहे. गुगल कंपनीचे प्रसिद्ध क्लाऊड प्लॅटफॉर्म अँथ्रोपिक कंपनीला वापरण्यास मिळणार आहे. ओपन एआय आणि अँथ्रोपीक या दोन्ही कंपन्यां एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असून AI क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत. Open AI कंपनीचे Chat GPT हे टूल प्रसिद्ध झाले असून त्यावर चर्चा सुरू आहे.

AI तंत्रज्ञान नक्की काम कसे करते? (How AI Technology works)

मशिनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सॉफ्टवेअर अल्गोरिदम तयार केले जातात. या अल्गोरिदममध्ये विविध प्रकारची माहिती साठवली जाते. त्याद्वारे अल्गोरिदमला प्रशिक्षण दिले जाते. उदाहर्णार्थ. व्यक्ती एखादी भाषा कशी बोलतो, हे मशिनला शिकवण्यासाठी आवाजाचे आणि लिखाणाचे वैविध्यपूर्ण नमुने अल्गोरिदममध्ये भरले जातात. मशिनला शब्दांचे हुबेहूब माणसांचे आवाज कसे काढायचे याबाबत प्रोग्रामिंग टुल्सद्वारे शिकवण्यात येते. हेच AI tool कॉल सेंटर, सर्च इंजिन, गुगल असिस्टंट सारख्या अॅपलिकेशद्वारे ग्राहकांना वापरता येते.

AI तंत्रज्ञान विकून कंपन्या पैसे कसे कमावतात? (How companies earn from AI)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपन्या AI तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहेत. याद्वारे विकसित केलेले तंत्रज्ञान या कंपन्यांद्वारे विविध क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसाय वृद्धीसाठी विकले जाते किंवा सब्सस्क्रिप्शनद्वारे वापरण्यास दिले जाते. त्यासाठी पैसे चार्ज केले जातात. सोबतच AI तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी कंपनी स्वत:चे तंत्रज्ञानही विकसित करू शकते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल या कंपन्यांनी अशी स्वत:ची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे.

जमीन मोजणी, विमा पॉलिसी खरेदी करण्याची प्रक्रिया, क्लेम सेटलमेंट, बँक खाते खोलण्याची प्रक्रिया, अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना, रुग्णावरील उपचार करण्यासाठी यासारख्या विविध बाबींसाठी AI तंत्रज्ञान वापरता येऊ शकते. भविष्यात याचा वापर अधिक वाढणार आहे.