Sundar Pichai : Google व Google ची पैरेंट कंपनी alphabet चे सीईओ यांनी 2022 मध्ये आपलं वेतन म्हणून चक्क 226 मिलीयन डॉलर कमावले आहेत. यामध्ये 218 मिलीयन डॉलर हे केवळ कंपनीकडून त्यांना देण्यात आलेले स्टॉक अवॉर्ड्स आहेत. सुंदर पिचाई यांच्या या वेतनाबद्दल माध्यमामध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. याला कारण आहे ते म्हणजे गूगलकडून नुकताच करण्यात आलेली नोकरकपात. कारण पिचाई यांचे वेतन हे कंपनीच्या मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 800 पटीने अधिक आहे. कंपनीच्या वेतनामधील ही तफावत आणि कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या नोकरकपात हा चर्चेचा विषय बनला आहे.
सुंदर पिचाई यांची वेतनवाढ
गूगल कंपनीकडून सर्वाधिक पगार हा सीईओ सुंदर पिचाई यांना दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून त्यांना गूगलकडून 2 मिलीयन डॉलर पगार दिला जात आहे. पण पगाराशिवाय कंपनीकडून मिळणारे अन्य लाभ व कंपनी शेअर्सची किंमतीमुळे पिचाई यांच्या वार्षिक कमाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
स्टॉक अवॉर्ड्स म्हणजे काय
सुंदर पिचाई यांच्या 2022 च्या वेतनामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो त्यांना कंपनीकडून मिळालेल्या 218 मिलीयन डॉलर स्टॉक अवॉर्ड्सचा. पाहुयात हे स्टॉक अवॉर्ड्स काय असतं.
कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कामगिरी व त्यांच्या कार्यामुळे कंपनीच्या प्रगतीत, उत्पन्नांत वाढ झाली असेल तर त्याचा मोबादला म्हणून कंपनीकडून त्या अधिकाऱ्यांना स्टॉक अवॉर्डच्या माध्यमातून गौरविले जाते. तर तीन वर्षांनी अधिकाऱ्यांना स्टॉक अवॉर्ड दिले जाते. यामध्ये कंपनीतील खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांना सुद्धा
गूगलकडून करण्यात येणारी नोकरकपात
एकीकडे गूगलकडून जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जात आहे. तर दुसरीकडे सुंदर पिचाई यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये गूगल वाढ करत आहे. या दोन्ही घटनेतील विसंगतीमुळे आज माध्यमांमध्ये गूगलची चर्चा सुरू आहे. गूगलने जानेवारी 2023 मध्ये कंपनीच्या एकुण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के म्हणजे जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनीने या झुरीच इथल्या मुख्यालयातील 200 कर्मचाऱ्यांना नोकरूवरून काढून टाकले तेव्हा या घटनेच्या निषेधार्थ अन्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.