एफडीमध्ये (Fixed deposit) व्याजदर खूप जास्त नसतात. मात्र तरीदेखील गुंतवणूकदार यात गुंतवणूक करत असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून विनाजोखीम (Risk free) परतावा या माध्यमातून मिळत असतो. व्याजदर मात्र बँकांकडून कमी दिलं जातं. यात आता चांगला व्याजदर देऊ केला आहे तो फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनं (Fincare small finance bank). आपली नवीन बहुभाषिक टीव्हीसी मोहीम 'द ग्रेट इंडियन एफडी फेस्ट' सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Table of contents [Show]
व्याजदरांचाही पाऊस
या पावसाळ्याच्या हंगामात मुदत ठेवींवरच्या व्याजदरांचादेखील पाऊस पडत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य नागरिकांसाठीही अतिशय आकर्षक व्याजदर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.11 टक्के आणि सामान्य नागरिकांसाठी 8.51 टक्के दर देत आहे.
बँकेची विशेष मोहीम लाइव्ह!
ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद हे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांचाही या मीडिया मोहिमेत समावेश आहे. ही मोहीम आज 10 जुलै 2023 रोजी लाइव्ह झाली आहे. टीव्ही, इंग्रजी आणि प्रादेशिक वृत्त नेटवर्क तसंच सोशल मीडियावर मेट्रो आणि प्रमुख प्रादेशिक बाजारपेठांवर केंद्रित असणार आहे.
Improve your Financial Wellness with @FincareBank !!!
— Fincare Small Finance Bank (@FincareBank) July 5, 2023
Invest in Fixed Deposit and earn interest up to 9.11%.#accelerate#acceleration#speed pic.twitter.com/KVPiK9bDLH
मोहिमेचा उद्देश काय?
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनं सर्व प्रकारांतल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक व्याजदराबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. शिवाय एक स्थिर आणि दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून मुदत ठेवींच्या महत्त्वावर भर दिला जात आहे. प्रत्येकासाठी हा पर्याय उपयुक्त आहे. ज्यात नोकरी करणारा असो, लग्न करणं किंवा शिक्षण घेणं अशा सर्वांसाठी त्याचा फायदाच आहे.
बँकेनं काय म्हटलं?
आपल्या विशेष मोहिमेविषयी बँकेनं माहिती दिली आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्य विपणन अधिकारी पंकज गुलाटी याविषयी म्हणाले, की आमची नवीन ब्रँड मोहीम 'द ग्रेट इंडियन एफडी फेस्ट' लॉन्च करताना मला खूप आनंद होत आहे. मुदत ठेवींच्या माध्यमातून आपलं आर्थिक भविष्य कसं सुरक्षित करावं, हे सांगणारी ही मोही आहे. आकर्षक व्याजदर, एकापेक्षा जास्त कालावधीचे पर्याय आणि सुरक्षिततेवर (Safety) भर अशा विविध ऑफर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतात.