देशातील खासगी क्षेत्रातील नामांकित इंडसइंड बँक (IndusInd Bank) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit) पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आहे. इंडसइंड बँकेने 2 जून 2023 पासून मुदत ठेवींवरील व्याजदर बदलले आहेत. बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदरात बदल केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बँक 0.50 टक्के जास्त व्याजदर देत आहे. त्यामुळे तुम्ही देखील इंडसइंड बँकेमधील मुदत ठेवीत पैसे गुंतवणार असाल, तर त्यापूर्वी बँकेचे सुधारित व्याजदर जाणून घ्या.
बँकेचा व्याजदर जाणून घ्या
इंडसइंड बँक (IndusInd Bank) आपल्या ग्राहकांना 7 दिवसापासून ते 30 दिवसांच्या कालावधीसाठी 3.50 टक्के व्याजदर देत आहे. तर 31 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 4 टक्के व्याजदर देण्यात देत आहे.
बँक 46 ते 60 दिवसांच्या कालावधीतील गुंतवणुकीसाठी 4.5 टक्के व्याजदर देत आहे. तसेच ग्राहकांना 61 दिवस ते 90 दिवसांच्या गुंतवणुकीवर 4.6 टक्के व्याजदर मिळणार आहे. 91 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीतील गुंतवणुकीवर 5 टक्के व्याजदर मिळणार आहे.
दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीवर किती व्याजदर मिळेल?
इंडसइंड बँक (IndusInd Bank) 1 ते 2 वर्षाच्या कालावधीतील गुंतवणुकीसाठी ग्राहकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. 2 वर्ष ते 3 वर्ष 3 महिन्यांसाठी ग्राहकांना बँक 7.50% व्याजदर देणार आहे. तर 3 वर्ष 3 महिने ते 61 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. तसेच 61 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ग्राहकांना 7 टक्के व्याजदर मिळणार आहे. कर सवलतीसाठी ग्राहकांना 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर बँकेकडून 7.25 टक्के व्याज मिळणार आहे.
सर्वाधिक व्याजदर किती? त्याचा कालावधी जाणून घ्या
इंडसइंड बँक मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) गुंतवणुकीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.75 टक्के वार्षिक आधारावर सर्वाधिक व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के सर्वाधिक व्याज मिळणार आहे. सर्वाधिक व्याजदर ग्राहकांना 1 ते 2 वर्षाच्या कालावधीतील मुदत ठेवीवर दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी गुंतलेल्या प्रत्येक मुदत ठेवींवर 0.50 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com