ST Workers Salary: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार ((MSRTS Salary) झाले नव्हते. तसेच महिन्याची बारा तारीख उलटली, तरी या कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात जमा झाले नसल्यामुळे, एसटी कर्मचाऱ्यांनी नाराज होऊन आंदोलनाचा इशारा दिला. यावर राज्यसरकारव्दारे तातडीने निर्णय घेऊन एक परिपत्रक जाहीर करण्यात आले. या परित्रकात एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार असल्याचे जाहीर केले असून, याव्यतिरिक्त परित्रकात काय सांगितले आहे, याबाबत सविस्तर समजावून घेवुयात.
300 कोटी निधी जाहीर (300 Crore Fund Announced)
मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा झाला नाही. तसेच महिन्याची बारा तारीख होऊन गेली, तरी आणखी पगार झाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी नाराज होऊन, आंदोलनाचा इशारा दिला. यावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन एसटी कर्मचाऱ्यांसाठी 300 कोटी रूपये वितरित करणार असल्याचे परिपत्रकात जाहीर केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोनच दिवसात पगार जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची ही संक्रांत गोड होणार आहे, हे मात्र खरं.
फक्त मूळ वेतन मिळणार (Only Basic Salary will be Given)
राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार अखेर होणार आहे. यासाठी राज्य शासनाने तीनशे कोटी रूपयांचा निधी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकांव्दारे जाहीर केले आहे. त्यामुळे कित्येक महिने रखडलेला पगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसत आहे. याशिवाय या परिपत्रकात असे ही सांगण्यात आले आहे की, हा जो दिला जाणारा पगार आहे, यामध्ये फक्त मूळ वेतन मिळणार असून ग्रॅज्यूटी किंवा पीएफची रक्कम दिली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी संघटनेची प्रतिक्रिया (Reaction of ST Organization)
राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलेला 300 कोटी रूपये निधी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अपुरा असल्याचे काॅंग्रेंस प्रणित संघटनेचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला वेळेवर व्हावा, यासाठी 360 कोटी रूपये देण्याची आवश्यकता आहे. कारण आता 1 हजार 200 कोटी रूपये पर्यंतची रक्कम ही एसटी कर्मचाऱ्यांची थकलेली देणी असल्यामुळे, हा जो निधी दिला आहे, तो कर्मचाऱ्यांसाठी अपुरा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.