Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PhonePe payment: छोट्या व्यापाऱ्यांना फोनपेकडून खूशखबर, होणार 8 लाख रुपयांपर्यंची बचत!

PhonePe payment: छोट्या व्यापाऱ्यांना फोनपेकडून खूशखबर, होणार 8 लाख रुपयांपर्यंची बचत!

Image Source : www.economictimes.indiatimes.com

PhonePe payment: अग्रगण्य फिनटेक कंपनी फोनपेनं छोट्या व्यापाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची जवळपास 8 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. विशेष म्हणजे इतर पेमेंट गेटवे दोन टक्क्यांपर्यंत स्टँडर्ड ट्रांझॅक्शन चार्ज घेतात, त्यात फोनपेनं नव्या व्यापाऱ्यांना प्लॅटफॉर्मसोबत मोफत येण्याचं आवाहन केलंय.

पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये सध्या विविध खेळाडू आहेत. त्यात फोनपेनं स्वत:ची जागा निर्माण केली आहे. पेमेंट प्लॅटफॉर्मवर व्यापाऱ्यांकडून व्यवहारावर चार्जेस (Charges) आकारले जातात. मात्र फोनपेनं नव्या, छोट्या व्यापाऱ्यांना मोफत सुविधा पुरवण्याचं ठरवलंय. या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांची पैशांची मोठी बचत (Saving) होणार आहे. तब्बल 8 लाख रुपयांपर्यंत ही बचत होणार आहे. फोनपे पेमेंट गेटवे नव्या व्यापाऱ्यांना कोणतंही छुपं शुल्क, सेटअप शुल्क किंवा वार्षिक देखभाल शुल्क घेणार नसून प्लॅटफॉर्मवर विनामूल्य सामील होण्यासाठी विशेष ऑफर देत आहे. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे.

दोन लाख रुपयांची बचत 

जर 1 कोटी रुपयांची मासिक विक्री असलेल्या व्यवसायांनी फोनपे पेमेंट गेटवे विनामूल्य निवडलं तर ते दर महिन्याला सुमारे दोन लाख रुपयांची बचत करू शकतात. फोनपे पेमेंट गेटवेच्या या मर्यादित कालावधीच्या ऑफरसह प्लॅटफॉर्मवर सामील होणारे संपूर्ण भारतातले व्यावसायिक 8 लाखांपर्यंत बचत करू शकतात. ते त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी फोनपेमध्ये सामील झाल्यामुळे बचतीची गुंतवणूक करू शकतात.

'एक विश्वासार्ह पेमेंट गेटवे'

फोनपे पेमेंट गेटवेच्या क्षमतेविषयी फ्लॉवरऑरा आणि बेकिंगोच्या (FlowerAura & Bakingo) सह-संस्थापक सुमन पात्रा यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, की ई-कॉमर्स व्यवसाय म्हणून एक विश्वासार्ह पेमेंट गेटवे भागीदार असणं महत्त्वाचं आहे. फोनपे भागीदार म्हणून मिळाल्यानं आम्हाला आनंद आहे. ग्राहकांना योग्य सुविधा पुरवणं, त्यात सुधारणा करणं, ड्रॉप-ऑफ कमी करण्यात आणि एकूण पेमेंट सक्सेसचं प्रमाण अधिक ठेवण्यात फोनपेची मोठी मदत झाली, असं त्यांनी सांगितलं. फोनपेचं स्मूद ऑनबोर्डिंग प्रोसेस आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पुढे कायम राहण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.

50 टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह मार्केट लीडर

फोनपे यूपीआय प्रकारारत आधीच 50 टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह मार्केट लीडर आहे. मोठ्या प्रमाणावर व्यवहार हाताळण्याची कंपनीची क्षमता आणि प्लॅटफॉर्मवरचा ग्राहकांचा दृढ विश्वास यामुळे फोनपेनं ग्राहक आणि व्यापाऱ्यांना एक चांगला पेमेंट एक्सपिरीयन्स देण्यासाठी पेमेंट गेटवे व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केलं आहे. कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीमुळे फोनपे पेमेंट गेटवे हा देशभरातला व्यवसाय आणि एमएसएमईमध्ये (MSME) एक आवडीचा पर्याय होत आहे.

'पोहोच आणि मिळणार प्रतिसाद महत्त्वाचा'

फोनपेच्या उत्कृष्ट पेमेंट प्रकाराविषयी जारचे सह संस्थापक आणि सीईओ निश्चय ए. जी. यांनीही काही सांगितलं आहे. ते म्हणाले, की जेव्हा आम्ही जार (Jar) लाँच केलं, तेव्हा आम्हाला पहिल्या दिवसापासूनच हे स्पष्ट झालं होतं, की आम्हाला फोनपे हा आमचा पेमेंट पार्टनर हवा आहे. कारण या प्लॅटफॉर्मची पोहोच आणि मिळणार प्रतिसाद. फोनपेचं मोठं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आमच्यासाठी आमचं काम अधिक सोपं करण्यास मदत करतं. फोनपेची पेमेंट गेटवे टीम सतत सहकार्य करते. एकूण सिस्टममध्ये सतत सुधारणा करण्यासाठी एकत्र काम आम्ही करत आहोत, त्यामुळे आम्हाला खूप यशदेखील मिळालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांसाठी 100 टक्के अपटाइम

कंपनीनं सांगितलं, की फोनपे पेमेंट गेटवे विश्वासार्ह आहे. व्यापाऱ्यांसाठी 100 टक्के अपटाइम देतं. त्याचा यशाचा दर उद्योगातला सर्वोत्तम आहे. हे सक्रियपणे डाउनटाइम शोधतं आणि इन्स्ट्रुमेंटच्या रिअल टाइम हेल्थ ट्रॅकिंग क्षमतेसह ट्रान्झॅक्शनचा सक्सेस रेट वाढवतं. याच कारणासाठी व्यापाऱ्यांनीदेखील आम्हाला प्राधान्य दिलं आहे. कारण ते विविध प्लॅटफॉर्मवर सहज कॉम्पॅटिबल आहे. नो-कोड सेटअपमुळे त्रास नाही. फोनपे अँड्रॉइड, आयओएस, वेब आणि डेस्कटॉपवर ऑनलाइन पेमेंट करण्यास सक्षम आहे.