Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming SME IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ ओपन

Upcoming SME IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ ओपन

Upcoming SME IPO: 100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. अशा 5 कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात ओपन होणार आहेत.

Upcoming SME IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. या आठवड्यात जवळपास 5 एसएमई कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होत आहेत. त्यातील Bizotic Commercial, Spectrum Talent Management आणि Urban Enviro Waste Management कंपनीचे आयपीओ ओपन झाले आहेत. तर CEll Point आणि Cosmic CRF कंपनीचा आयपीओ अनुक्रमे 15 आणि 14 जून रोजी ओपन होणार आहेत.

SME IPO म्हणजे काय? 

100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये  दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. SME कंपन्यांचे आयपीओ या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होतात.

SME IPO मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. पण या कंपन्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. तसेच यामध्ये योग्य माहितीच्या गुंतवणूक केली असता गुंतवणूकदारांना चांगला परतावादेखील मिळू शकतो.

Bizotic Commercial

बिझोटिक कमर्शिअल कंपनीचा आयपीओ सोमवारपासून (दि.12 जून) गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. तो 15 जूनपर्यंत ओपन असणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 40.09 कोटी रुपये उभारणार आहे. याच्या एका लॉटमध्ये किमान 800 शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत 175 रुपये निश्चित करण्यात आली. या शेअर्सचे लिस्टिंग बीएसईवर होणार आहे.

Cell Point

सेल पॉईंट कंपनीचा शेअर 15 जूनपासून गुंतवणुकीसाठी ओपन होणार असून तो 20 जूनपर्यंत खुला असणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 47.82 कोटी रुपये उभारणार आहे. याच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स असणार आहे. यातील प्रत्येक शेअर्सची किंमत 100 रुपये आहे.

Cosmic CRF 

कॉस्मिक सीआरएफ कंपनीचा आयपीओ 14 जून रोजी ओपन होणार असून तो 16 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 54.34 कोटी रुपये उभे करणार आहे. याच्या एका लॉटमध्ये 400 शेअर्स असणार आहेत. कंपनीची याची प्रति शेअरची किंमत 314-330 रुपये निश्चित केली. हा आयपीओ बीएसईवर लिस्टिंग होणार आहे.

Spectrum Talent Management

स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ 9 जून रोजी ओपन झाला असून त्यात 14 जून (बुधवार) पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 97.57 कोटी रुपये उभे करणार आहे. याची किंमत कंपनीने 169-173 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हा आयपीओ एनएसईवर लिस्टिंग होणार आहे.

Urban Enviro Waste Management

अर्बन एनव्हि5 रो वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ सोमवारी (दि. 12 जून) ओपन झाला असून तो 14 जून पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 10.84 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने याच्या प्रति शेअरची किंमत 100 रुपये अशी निश्चित केली आहे. हा आयपीओ एनएसईवर लिस्टिंग होणार आहे.