Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SME IPO म्हणजे काय? यासाठी अ‍ॅप्लाय कसे करतात?

What is SME IPO

Image Source : www.chittorgarh.com

What is SME IPO: एसएमई आयपीओ हा नियमित आयपीओप्रमाणेच एक प्रकार आहे. या एसएमई स्मॉल अ‍ॅण्ड मीडिअम कंपन्या. ज्या कंपन्यांची उलाढाल 100 कोटींच्या आत असते. त्या कंपन्या जेव्हा आयपीओ आणतात; तेव्हा त्याला एसएमई आयपीओ म्हणतात.

आयपीओ म्हणजे काय? याबद्दल आपल्या सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. जेव्हा एखादी असूचीबद्ध कंपनी (Not Listing Company) प्रथमच प्रथमच लोकांसाठी शेअर विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते. तेव्हा कंपनी आयपीओ जाहीर करते. त्याला प्रारंभिक सार्जजनिक ऑफर म्हणजेच Initial Public Offer-IPO असे म्हटले जाते. या आयपीओ प्रमणेच एसएमई आयपीओ (SME IPO) देखील असतो. या एसएमई आयपीओमध्ये स्मॉल आणि मिडिअम इंटरप्रायजेस कंपन्यांचा समावेश होतो.

SME म्हणजे काय?

ज्या कंपन्यांचे भांडवल, महसूल, कामगारांची संख्या ही कंपनी कायद्याने ठरवून दिलेल्या नियमानुसार लघु आणि मध्यम श्रेणीच्या कंपन्यांमध्ये येणारी असते. त्या कंपन्यांना स्मॉल आणि मध्यम कंपन्या (Small - Medium Enterprises-SME) म्हटले जाते. स्मॉल कंपन्यांमध्ये किमान गुंतवणूक ही 1 ते 10 कोटी दरम्यान आणि या कंपन्यांची उलाढाल 5 ते 50 कोटी रुपये या दरम्यान असते. तसेच मध्यम कंपन्यांमधील गुंतवणूक ही 10 ते 20 कोटी आणि उलाढाल 50 ते 100 कोटी रुपये या दरम्यान असते. एकूण ज्या कंपन्यांची कमाई 100 कोटींपेक्षा कमी असते. त्या कंपन्यांना SME कंपन्या म्हटले जाते.

SME IPO म्हणजे काय? 

100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये  दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.

SME IPO मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. पण या कंपन्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. तसेच यामध्ये योग्य माहितीच्या गुंतवणूक केली असता गुंतवणूकदारांना चांगला परतावादेखील मिळू शकतो.

SME IPO आणण्यासाठी भारतात काय नियम आहेत?

  • एसएमई कंपन्यांचे भांडवल हे 3 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. 
  • त्याचबरोबर कंपनीची एकूण मालमत्ता आणि मूर्त मालमत्तेचे मूल्यही तितकेच असणे आवश्यक आहे.
  • कंपनीला मागील 3 आर्थिक वर्षांपैकी किमान 2 वर्षामध्ये पुरेसा नफा झाला आहे, हे दाखवणे आवश्यक आहे.
  • सेबीच्या नियमानुसार, एसएमईचा आयपीओ आणण्यासाठी त्याची प्राईस ब्रॅण्ड फिक्स असते.

SME IPO मध्ये गुंतवणूक कशी केली जाते?

झिरोधा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून जसे नियमित आयपीओसाठी अॅप्लाय केले जाते. त्याचप्रमाणे झिरोधावरून SME IPO साठी अ‍ॅप्लाय करता येते. झिरोधा व्यतिरिक्त इतर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म SME IPO ला अ‍ॅप्लाय करण्याची सोय देत नाहीत. असे गुंतवणूकदार त्यांच्या बॅंक खात्याच्या ऑनलाईन बॅंकिंग प्लॅटफॉर्मवरून SME IPO साठी अ‍ॅप्लाय करू शकतात. यासाठी गुंतवणूकदाराला बॅंकेच्या नेट बॅकिंगवरून ASBA साठी रजिस्टर्ड करावे लागेल. ASBA वर रजिस्टर्ड करताना गुंतवणूकदाराला आपल्या डिमॅट खात्याची माहिती द्यावी लागते. बॅंक खातेधाराच्या डिमॅट खात्यातून माहिती घेऊन त्याआधारे गुंतवणूकदारासाठी SME IPOची खरेदी करू शकते. खरेदी केलेला आयपीओ हा डिमॅट खात्यात जमा होतो.