संभाव्य जागतिक आर्थिक मंदीची परिस्थिती लक्षात घेता असा निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे. जागतिक मंदीच्या भीतीने जगभरातील केंद्रीय बँका (Central Bank) व्याजदर घटवण्याची शक्यता आहे. भारतातील बँका देखील हाच ट्रेंड कायम ठेवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्याजदराबाबत धोरण आखताना महागाई नियंत्रणात ठेवायची असले तर याशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. जागतिक पातळीवर देखील असेच निर्णय सध्या घेतले जात आहेत.
आयबीआय (RBI) ने गेल्या वर्षी महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात अनेकदा वाढ केली होती. त्यामुळे अनेक बँकांनी गेल्यावर्षी व्याज दर वाढवले होते. व्याजदरात (Interest Rate) कपात झाल्यास त्याचा थेट फायदा हा ग्राहकांना मिळणार आहे.