Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar Card : आता फक्त एका कॉलवर होणार 'ही' सर्व कामे

Aadhaar Card

भारतात अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) परिचयाचे आहे. सध्या आधार कार्ड एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्या सुविधा कोणत्या? ते आज पाहूया.

भारतात अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून आधार कार्ड (Aadhar Card) परिचयाचे आहे. सध्या आधार कार्ड एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे, ज्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आधार कार्डचे महत्त्व आणि गरजा लक्षात घेऊन युआयडीएआय (UIDAI) देखील देशातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन सेवा सुरू करत असते. आता युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्या सुविधा कोणत्या? ते आज पाहूया.

आधारच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास या महत्त्वाच्या गोष्टी होणार

युआयडीएआय (UIDAI) ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये IVRS वर नवीन सेवा सुरू झाल्याचं सांगितलं आहे. युआयडीएआय (UIDAI) ने माहिती दिली की आधार कार्ड धारक आता टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करून 24x7 IVRS सेवा घेऊ शकतात. नवीन सेवांमध्ये नागरिक आधारच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून नवीन आधार कार्ड नोंदणीची स्थिती, आधार कार्डमधील कोणत्याही अपडेटची स्थिती, पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डरची स्थिती, कोणत्याही तक्रारीची स्थिती, जवळच्या आधार नोंदणी केंद्राची स्थिती जाणून घेऊ शकतात. याशिवाय आधार कार्डधारक टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आवश्यक माहिती एसएमएसद्वारेही मिळवू शकतो.

आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन 

युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांना आवाहन केले आहे की जर त्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले गेले असेल आणि त्यांनी या 10 वर्षांत एकदाही त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. फक्त आधार कार्ड असणे आवश्यक नाही तर तुमचे आधार कार्ड अद्ययावत ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अशा परिस्थितीतही तुमची अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा

ज्यांच्याकडे पॅनकार्ड आणि आधारकार्ड अशी दोन्ही महत्त्वाची कार्ड आहेत आणि ते टॅक्स सवलतीच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. अशा पॅनधारकांनी 31 मार्च, 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जे पॅन कार्डधारक दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणार नाहीत. त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल, 2023 पासून बाद केले जाणार आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून वेळोवेळी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. पण अजूनही अनेक पॅन कार्ड धारकांनी ते लिंक केलेले नाही. अशा कार्डधारकांवर कारवाई करण्याची इन्कम टॅक्स विभागाकडून मोहिम उभारण्यात आली. जे पॅन कार्डधारक दिलेल्या मुदतीत लिंक करणार नाही. अशा कार्डधारकांचे पॅनकार्ड 1 एप्रिल, 2023 पासून बाद केले जाणार आहे.