• 27 Mar, 2023 05:30

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan interest: आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात

Interest Rate on Home Loan

Image Source : www.livemint.com

Interest Rate on Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर सर्व बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. पुणे स्थित सरकारी मालकी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank of Maharashtra) अशाप्रकारे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करणारी दुसरी बँक ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ बडोदाने व्याजदर 40 बेसिस पॉइंटने कमी करून 8.50 टक्के केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात (Repo Rate) सातत्याने वाढ झाल्यानंतर सर्व बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. पुणे स्थित सरकारी मालकी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. होमलोनच्या व्याजदरात कपात करणारी ही दुसरी बँक ठरली आहे. बँक ऑफ बडोदाने व्याजदर 40 बेसिस पॉईंटने कमी करून 8.50 टक्के केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राने रविवारी गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली (BOM reduced interest on home loan). बँकेने गृहकर्जावरील व्याजदर सध्याच्या 8.6 टक्क्यांवरून 8.4 टक्के केला आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन दर 13 मार्च 2023 पासून लागू होतील. हे गृहकर्ज 8.4 टक्के व्याजदरासह बँकिंग क्षेत्रातील सर्वात स्वस्त गृहकर्जांपैकी एक आहे.

कर्जावर प्रक्रिया शुल्क नाही (No Processing Fee on Loan)

सोने, गृहनिर्माण आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे. गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानेही गृहकर्जावरील व्याजदर 0.40 टक्क्यांनी कमी करून 8.5 टक्के केले होते. बँकेने एमएसई (MSE) कर्जावरील बँक दरही कमी केला आहे. बँक यापुढे एमएसई कर्जावर 8.4 टक्के व्याजदर आकारणार आहे.

एमएसई व्याजदर कमी (MSE Interest Rate Reduction)

बँकेने एमएसई (Micro and Small Enterprises) कर्जावरील व्याजदरही कमी केले होते. बँक एमएसएमई कर्जावर 8.4 टक्के दराने व्याज आकारण्यास सुरुवात करेल. BOB ने एका निवेदनात म्हटले आहे की, व्याजदरातील दोन्ही बदल 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंतच अंमलात आणले जातील. BOM चे व्यवस्थापकीय संचालक ए.एस. राजीव यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, रिटेल अॅडव्हान्सची गुणवत्ता सुधारणे ही एक व्यावसायिक रणनीती आहे, विशेषतः गृहकर्जाचे दर, बँकेला गृहकर्जाचे दर कमीकरण्यास प्रवृत्त करणे.  BoM ने यापूर्वी होम लोन तसेच गोल्ड लोन आणि कार लोनसाठी प्रोसेसिंग फी माफ केली होती.

संरक्षण कर्मचाऱ्यांना विशेष सवलत (Special Discount for Defense Personnel)

गृहकर्जावरील 8.4 टक्के व्याजदर हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक आहे. याशिवाय बँक संरक्षण कर्मचाऱ्यांना विशेष व्याजदराने गृहकर्ज देते. यामध्ये निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश आहे. यासह, पगार आणि पेन्शनर संरक्षण कर्मचार्‍यांना परवडणाऱ्या व्याजदरात गृहकर्ज मिळते.