Sukanya Samriddhi Account: मुलींच्या शिक्षणाचा खर्च असो किंवा लग्नाचा आता पालकांना मुलींच्या भविष्यासाठी कोणासमोर झुकावे लागणार नाही. कारण मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी शासनाने ‘सुकन्या समृध्दी योजना’ (Sukanya Samriddhi Account) सुरू केली आहे. या योजना बॅंक ऑफ महाराष्ट्राने 2 डिसेंबर 2014 पासून लागू केली. मात्र या योजनेसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते कसे उघडायचे, याबाबत अधिक जाणून घेवुयात.
खाते कोणाच्या नावावर सुरू करायचे? (In whose Name should the Account be Opened)
विशेष म्हणजे बॅंक ऑफ महाराष्ट्रा (Bank Of Maharashtra) च्या कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही खाते सुरू करू शकता. हे खाते आपण मुलीच्या जन्मापासून ते ती 10 वर्षाची होईपर्यंत उघडू शकता. या योजनेच्या लाभ दोन मुली किंवा तीनपर्यंत जुळया मुलीं होणारे पालकदेखील या योजनेमध्ये मुलींच्या नावाने या खात्याचा लाभ घेऊ शकतात. मात्र तिसरी झालेल्या मुलगी असणाऱ्या पालकांना आपल्या तिसऱ्या मुलीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मुलींच्या भविष्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. या योजनेची सुरूवात अगदी कमी रकमेपासूनदेखील करू शकता.
यासाठी किती शुल्क भरावे लागते? (How much Does it Cost)
सुरूवातीला हे खाते उघडताना 100 रुपये चार्ज भरावे. यानंतर तुम्ही ही रक्कम 250 रूपयांपासूनदेखील सुरू करू शकता. यासाठी तुम्ही वर्षाला साधारण 150000 रुपयांपर्यंत रक्कम भरू शकता. या खात्याची मुदत पालकांना वाढून देखील मिळते. हे खाते सुरू केल्यापासून साधारण 21 वर्षांपर्यंत या खात्यावर पैसे जमा करून खाते सुरू ठेवू शकता. यानंतर तुम्ही हे पैसे तुमच्या स्वत:च्या खात्यावर घेऊ शकता किंवा ते काढून घ्यावे लागेल.
किती वर्षे पैसे गुंतवायचे (How Many Years To Invest The Money)
या सुकन्या योजनेत साधारण खाते सुरू केल्यापासून तुम्हाला 15 वर्ष तरी पैश्यांची गुंतवणूक करायची. जास्तीत जास्त तुम्हाला 21 वर्षांपर्यंत हे खाते सुरू ठेवता येणार आहे. जर तुम्ही खात्यात पैसे टाकायचे विसरल्यास, तर 50 रूपये दंड स्वरूपात आकारले जाते. या योजनेसाठी तुमचे व्याजदर हे तिमाही आधारावर भारत सरकार जाहीर करते. या योजनेसाठी आयटी कायदा हा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत लागू करण्यात आला आहे.