Netflix: एकीकडे एक मोठ-मोठया कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात नोकरीवरून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे नेटफ्लिक्सने नोकरीची मोठी ऑफर दिली आहे. नेटफ्लिक्स या पदासाठी साधारण 3 कोटी वार्षिक पॅकेज देणार आहे. जागतिक मंदीमध्ये एवढे मोठे पॅकेज पाहून संपूर्ण जगभरात या ऑफरचीच चर्चा होत असल्याचे दिसत आहे.
काय आहे ऑफर (What is the Offer)
नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की, एका खाजगी जेट विमानासाठी फ्लाइट अटेंडंटची जागा रिक्त आहे. या पदासाठी कर्मचारी पाहिजे आहे. ही नोकरी कॅलिफोर्नियातील सॅन जोसमध्ये लॉस गॅटोस मुख्यालयासाठी आहे. या पदासाठी नेटफ्लिक्स कंपनी दरवर्षी 3 कोटीचे पॅकेज देणार आहे.
काय आहे प्रोफाइल (What is a Profile)
नेटफ्लिक्सने प्रोफाइलबाबत लिहिले आहे की, तुमच्यामध्ये एविशनच्यासंबंधी जोश व आवड असणे आवश्यक आहे. फ्लाइंट अटेंडंट हा सुपर मिडसाईज जेटवरचा प्राथमिक फ्लाइट अटेंडंट असणार आहे. त्याला प्रोफाइलनुसार एसजेसी स्टॉकरूमची देखभाल करावी लागेल व गरजेनुसार SJC फ्लाइट अटेंडंट G550 प्रवासालाही मदत ही करावी लागणार आहे. या कामासाठी त्या व्यक्तीला साधारण 60 हजार ते 3 लाख 85 हजार डॉलर इतका पगार देण्यात येणार आहे. हा पगार भारतील चलनानुसार 3 कोटी इतका आहे.
नोकरीबाबत आणखी माहिती (More Information About The Job)
उत्तर कॅलिफोर्नियामधील फ्लाइट अटेंडंट या पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवाराला केबिन, प्रवासी सुरक्षा आणि विमान आपत्कालीन निर्वासन यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोणतीही व्यक्ती या नोकरीसाठी इच्छुक असल्यास त्यांना स्वतंत्र निर्णय, विवेक आणि असामान्य अशी ग्राहक सेवा द्यावी लागणार आहे. तसेच एविएशन टीम नेटफ्लिक्सला अधिक कार्यक्षमतेने संपूर्ण जगभरात पोहोचण्यास मदत करीत आहे. त्यामुळे सर्व जगात ती आनंदाचे वातावरण पसरवत आहे.