Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold-Silver Price Today: आजही सोनं प्रति तोळा 56 हजारांच्याही पुढेच!

Gold & Silver Update

Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात(MCX) सोने 154 रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 142 रुपयांची घसरण झाली आहे.

Gold- Silver Price 19 Jan 2023: पौष महिना सरताच सगळीकडे लग्नसराईला सुरुवात झाली असून सोन्याच्या खरेदीला अनेकांचे प्राधान्य पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून भारतीय सराफ बाजारात(MCX) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज(19 जानेवारी 2023) बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर व्यवहार करत आहे. चला तर आजच्या दिवसातील सोन्या चांदीचे दर जाणून घेऊयात.

आजचा सोने चांदी दर काय?

आज(19 जानेवारी 2023)बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,470 रुपये झाला असून सोने 154 रुपयांनी महाग झाले आहे. तर, 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,764 रुपये आहे. भारतीय सराफ बाजारात आज चांदीत दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाली आहे. आज चांदी 0.21 टक्क्यांनी म्हणजे 142 रुपयांनी घसरून 68,085 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ हे अ‍ॅप बनविण्यात आले आहे. याच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपच्या माध्यमातून लगेच त्याबद्दल तक्रार नोंदवू शकतात.

सोन्यातील डायनॅमिक प्रायसिंग 

जगभरात सध्या डायनॅमिक प्रायसिंग (Dynamic Pricing) चा ट्रेंड आहे. अशा किमती ज्या गतिमान म्हणजे दर सेकंदाला बदलणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर सर्वच कमोडिटीज् (Commodiy) डायनॅमिक प्रायसिंगने ठरतात. भारतातही 2016 पासून केंद्रसरकारने अनेक बाबतीत अशी दरप्रणाली सुरू केली आहे. जशी विमानांची तिकीटं आपल्याला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दराने मिळतात. म्हणजे दिवसभरात कधी त्याचा निश्चित दर नसतो.     
प्रत्येक वेळा वेबसाईटवर आपण लॉग-इन केल्यावर आपल्याला कमी-जास्त किंमत मिळते. तशाच प्रकारचे व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटीज् मध्ये होताना दिसतात. भारतात सोन्याच्या किमतीही डायनॅमिक म्हणजे क्षणा क्षणाला बदलणाऱ्या आहेत. मागणी, दिवसभरात होणारे व्यवहार, उपलब्धा यानुसार किमती कमी-जास्त होतात. आणि तुम्ही व्यवहार पार पाडताना जी ताजी किंमत असेल ती तुम्हाला लागू होते. ई-कॉमर्स क्षेत्रातही डायनॅमिक प्रायसिंगचा ट्रेंड अमेरिका आणि इतर प्रगत देशांमध्ये आहे. 

हे देखील माहिती असावे

  • 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिण्यात येते 
  • 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916  लिहिण्यात येते 
  • 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875  लिहिण्यात येते 
  • 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750  लिहिण्यात येते 
  • 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिण्यात येते