आर्थिक अनिश्चितता आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील तेजी कायम आहे. आज मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याच भाव 166 रुपयांनी वाढला. सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 57000 रुपयांवर गेला आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57121 रुपये इतका वाढला आहे. त्यात 166 रुपयांची वाढ झाली. आज इंट्रा डेमध्ये सोन्याचा भाव 57194 रुपये इतका वाढला होता. आज सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीत देखील तेजी दिसून आली आहे. एक किलो चांदीचा भाव 67650 रुपये इतका असून त्यात 250 रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा भाव 56955 रुपयांवर बंद झाला होता. एक किलो चांदीचा भाव 67399 रुपयांवर स्थिरावला होता.
जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 0.2% ने वाढला असून तो 1870.63 डॉलर इतका झाला आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 0.2% ने वाढून 1882.50 डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. सोन्याचा भाव नजीकच्या काळात 1851 ते 1840 डॉलर या दरम्यान राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56250 रुपये ते 56360 रुपये या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह प्रमुख शहरांतील सोने दर जाणून घ्या
Goodreturns या वेबपोर्टलनुसार आज मंगळवारी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 57750 रुपये इतका आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत 110 रुपयांची वाढ झाली.गेल्या आठवड्यात सराफा बाजाराता सोन्याचा भाव 58800 रुपयांवर गेला होता. मात्र त्यात 1700 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 57000 रुपयांच्या आसपास आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 52900 रुपये असून त्यात 100 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 57700 रुपये इतका आहे. चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 53730 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 58620 रुपये इतका आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत 90 रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52750 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 57550 रुपये इतका आहे.