Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Should You Buy Gold? : दिवाळीत सोनं विकत घेणं ठरू शकतं फायदेशीर!

Buy Gold – Silver

Buy Gold – Silver : धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाग झालेलं सोनं विकत घेणं फायद्याचं ठरू शकतं! कारण प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52 हजार पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Buy Gold – Silver : सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसू लागली आहे. MCX (Multi Commodity Exchange of India Limited) या वेबसाईटवर डिसेंबर फ्युचरचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,965 रुपये सुरू आहे. तर चांदीचा डिसेंबर फ्युचरचा प्रति किलोचा भाव 61,600 सुरू आहे. यावर्षी सोन्याचा भाव बऱ्यापैकी खाली आला होता. पण त्यावर मात करत सध्या सोन्याच्या भावाला चांगली तेजी आली आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव वाढला. दिवाळीत धनत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्या-चांदीत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं का? तर याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सोनं-चांदीला घेऊन मार्केट बुलिश आहे. त्यांचं म्हणणं आहे की, शॉर्ट टर्ममध्ये सोनं आणि चांदी दोन्हींमधून चांगले रिटर्न मिळण्याची संधी आहे. यामागे 3 प्रमुख कारणं ते सांगतात.     

सोनं-चांदीमधून रिटर्न किती मिळू शकतं?

बुलियन एक्सपर्टचं म्हणणं आहे की, सोन्याला घेऊन लोकांच्या शॉर्ट टर्म सेंटीमेंट खूप तीव्र आहेत. दिवळीपर्यंत सोन्याचा भाव 53,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर चांदीचा भाव दिवाळीत 63,000 रुपये आणि वर्षाच्या शेवटापर्यंत तो 65,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये या महिन्यात सोन्याचा भाव 1720 डॉलरवरून 1750 डॉलरवर जाऊ शकतो. तर चांदी लवकरच 20 डॉलरवरून 21 डॉलरपर्यंत जाऊ शकते. 

खालील 3 कारणांमुळे सोन्याच्या भावात तेजी येऊ शकते!

आयआयएफएलचे अनुज गुप्ता  (Anuj Gupta (VP Research (Commodity & Currency) IIFL)) यांचं असं म्हणणं आहे की, शॉर्ट टर्ममध्ये सोनं पॉझिटीव्ह ट्रिगर आहे. यातला सर्वांत मोठा ट्रीगर हा आहे की, सरकारने प्लॅटिनमवरील आयात शुल्क 10.5 टक्क्यांवरून 15.4 टक्के केले. मागील काही दिवसांत प्लॅटिनमवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे व्यापारी प्लॅटिनमच्या ऐवजी सोनं मागवत होते. त्यावेळी सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून अधिक होतं.

पण आता प्लॅटिनम आयात करणं महाग झाल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मेटलकडे वळवला आहे. सोन्याची आयात सुद्धा कमी होणार, ज्यामुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या भावाला आधार मिळेल. तर दुसरीकडे भारतात फेस्टिव्हल सीझन सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष सोनं, सोन्याचे दागिने खरेदी करण्याची मागणी वाढू लागली. धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याची खरेदी आणि मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी एक मोठं कारण असं सांगितलं जातं की, जगभरातील मध्यवर्ती बॅंका (Central Bank) या आपापल्या देशांची मॉनेटरी पॉलिसी (पतधोरण) थोडीफार सैल सोडण्याची शक्यता आहे. याबाबत युनायटेड नेशनने जगभरातील सेंट्रल बॅंकांना तसा आग्रह ही धरला आहे. मॉनेटरी पॉलिसीमध्ये थोडी नरमता आली तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींना एक चांगला आधार मिळू शकेल.