आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली. तर काल गुरूवारी पुन्हा सोन्याची किंमत वाढली. पण आज शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सध्या लग्नसोहळ्यांचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सोनं-चांदी घेणाऱ्यांची गर्दी सराफा दुकानांमध्ये दिसत आहे. त्यामुळे ग्राहक आणि सराफ दोघांचेही लक्ष नेहमीच्या सोन्या-चांदीच्या किंमतींकडे लागलेले असते. मागील दो महिन्यांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. असे असले तरी या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहेत.
या आठवड्यात सोनं-चांदीच्या किंमतीत चढ-उतार
आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या किंमती कमी झाल्या. तर चांदीच्या दरांतही चढ-उतार पहायला मिळाले. काल गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. पण आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. जाणून घेऊयात आजचे सोनं आणि चांदीचे भाव.
सराफा बाजारातील सोनं-चांदीच्या किंमती (Today’s Gold and Silver Rates)
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज सोनं-आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,750 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 48,354 झाले आहेत. आज चांदीच्या किंमतीही कमी झाल्याचे चित्र आहे. आज 1 किलो चांदी 61,820 रुपये झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधील दर (MCX Rate of Gold and Silver)
आज शुक्रवारी 12.30 च्या सुमारास सोन्याचा फ्युचर रेट 41 रुपयांनी घसरला. तो 52,630 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. चांदीच्या दरातही घसरण पहायला मिळाली. चांदी 147 रुपयांनी घसरून 61,846 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत असल्याचे चित्र आहे.