• 04 Oct, 2023 13:20

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold and Silver Rates Today : सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर

Gold and Silver Price, Gold Price Today, Silver Price

Gold and Silver Rate Today : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्वस्त झाले आहेत. तर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लग्नसराईच्या हंगामात सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्वस्त झाले आहेत. Bankbazaar.com दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव 4,814 रुपये आहे. त्याचप्रमाणे इतर कॅरेटच्या दरातही घट पाहायला मिळाली आहे.

सोनं, चांदीची आजची किंमत (Today’s Gold and Silver Rates)

आज 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 5,252 आहे. तर 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी आज 4,814 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची आजची किंमत 52,520 आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची  आजची किंमत 48,143 रुपये झाली आहे. आज चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळाले. आज 1 ग्रॅम चांदीसाठी 62 रुपये तर 10 ग्रॅम चांदीची किंमत 616 रुपये झाली. तर 1 किलो चांदीचे दर 61,590 झाल्याचे पहायला मिळाले.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक (Difference Between 22 K and 24 K Gold)

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असून 22 कॅरेट सोनं सुमारे 91 टक्के शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त असे इतर 9 टक्के धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध आहे पण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.