Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unique gift ideas for Bhaubeej: या भाऊबीजेला तुमच्या लाडक्या भावाला द्या 'या' युनिक भेटवस्तु

Unique gift ideas for Bhaubeej

Unique gift ideas for Bhaubeej: दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवाळीला उद्या म्हणजेच 26 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. हा भाऊ आणि बहीण यांच्यातील मजबूत संबंधाचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. भाऊबीजेला भाऊ आणि बहीण या दोघांकडूनही एकमेकांना भेटवस्तु दिली जाते. या लेखात या वर्षीच्या भाऊबीजेला तुमच्या लाडक्या दादाला देण्यासाठी काही निवडक भेटवस्तु आहेत, जाणून घ्या.

Unique gift ideas for Bhaubeej: हिंदू मान्यतेनुसार, भाईबीज हा दिवस आहे ज्या दिवशी मृत्यूचे देवता भगवान यम यांनी त्यांची बहीण देवी यमुना यांना भेट दिली आणि तिच्या हातून अन्न घेतले, म्हणूनच हा दिवस बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी, समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज  साजरी केली जाते. भाऊबीजेला (What gift should you give to your sister and brother?)भाऊ आणि बहीण या दोघांकडूनही एकमेकांना भेटवस्तु दिली जाते. वर्षीच्या भाऊबीजेला तुमच्या लाडक्या दादाला (Unique gift ideas for Brother)देण्यासाठी काही निवडक भेटवस्तु या लेखातून तुमच्या पर्यंत पोहचणार आहेत, त्यासाठी तुम्हाला हा लेख वाचवा लागेल. 

घड्याळ  (Wrist watch)

प्रत्येकाला घड्याळांची क्रेझ असते, मग ते स्मार्टवॉच असो की एनालॉग. एनालॉग Wrist वॉच  ही क्लासिक निवड आहे यात शंका नाही. पण, आजकाल स्मार्ट घड्याळांचा ट्रेंड आहे. हे विविध आरोग्य पॅरामीटर्सचा मागोवा आणि निरीक्षण करण्यात मदत करते आणि तुमचे जीवन सोपे करते. या वर्षीच्या भाऊबीजेला तुमच्या भावासाठी ही एक चांगली भेटवस्तु असू शकते.

Watch-1

शूज (shoes)

मुलांना  शूजचे फॅन्सी कलेक्शन ठेवणे आवडते. तुम्ही त्यांची खरेदी विशलिस्ट  चेक केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त शूज सापडतील. म्हणून, जर तुमचा भाऊ देखील शूजचा शौकीन असेल आणि त्याच्या मनात नवीन जोडी असेल, तर तुम्ही ही विलक्षण भेटवस्तू त्याला देऊ शकता.

Shoes

ग्रूमिंग किट (Grooming kit)

मुलांना त्यांचा लुक नेहमी टिपटॉप ठेवायला आवडतो, ग्रूमिंग किट तुमच्या भावाला नक्कीच आवडेल. तुम्ही टॉप ब्रँड तपासू शकता ज्यांच्या प्रॉडक्टमध्ये जास्त रसायने नसतात आणि ते नैसर्गिक आवश्यक तेलांनी बनलेले असतात.

कॉमिक पुस्तके (Comic books)

जर तुमचा भाऊ किशोरवयात असेल तर त्याला कॉमिक बुक भेट देणे ही एक चांगली कल्पना असू शकते. हे त्याला वाचनाच्या सवयी विकसित करण्यास आणि सर्जनशीलता निर्माण करण्यास मदत करेल. ली फॉकचे फॅंटम, हर्जचे टिंटीन, मार्वल युनिव्हर्स आणि दिग्गज चाचा चौधरी ही काही उत्कृष्ट कॉमिक पुस्तके आहेत.

Comic Books

क्रिकेट किट (Cricket kit)

भारतात बहुतेक मुलांना क्रिकेटचे वेड आहे. चांगल्या दर्जाची क्रिकेट किट भेट देणे ही तुमच्या धाकट्या भावासाठी खरोखरच योग्य भेट असू शकते.

Cricket Kit