Diwali Gift: सणासुदीचा काळ सुरू आहे. सर्वांचा आवडता सण दिवाळी तोंडावर आहे. यानिमित्ताने एकमेकांना भेटवस्तू देण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार भेटवस्तू देतात. पण नेहमीप्रमाणे मध्यात येणार आपला विषय म्हणजे बजेट. त्यानुसार आपल्याला परवडेल अशा आणि देण्याऱ्याला आवडेल अशा भेटवस्तू आपण दिल्या पाहिजेत. प्रत्येकजण विचार करून भेटवस्तू देतात मग विचारच करायचा तर आरोग्याचा करा. आपण दिलेल्या भेटवस्तूमधून आनंद आणि निरोगी आरोग्य दोन्ही मिळाल पाहिजे. अशा भेटवस्तू पुढीलप्रमाणे.
Table of contents [Show]
डार्क चॉकलेट्स (Dark chocolate)
डार्क चॉकलेट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सणासुदीच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना हे गिफ्ट देऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर विटामीन आणि मिनरल असतात. हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. यासोबतच डार्क चॉकलेट्स अशक्तपणा, नैराश्य आणि थकवा दूर करते.
ड्रायफ्रूट्स (Dry fruits)
दिवाळीनिमित्त बहुतेक लोक एकमेकांना ड्रायफ्रूट्स देतात. तुम्हालाही एखादी छानशी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. यामध्ये तुम्ही बॉक्समध्ये अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता इत्यादींचा समावेश करू शकता. हे सर्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ड्रायफ्रूट्स अतिशय पोषक असते.
भेटवस्तू देण्यासाठी हेल्दी बार हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला भेटवस्तू देत आहात त्यांच्या घरात लहान मुलं असतील तर भेट म्हणून हेल्दी बार देता येईल. मुलं खूप आवडीने खातात, आरोग्यदायीही असतात. हेल्दी बार विटामीन, मिनरलने समृध्द आहे.
मखाना (Makhana)
मखाना हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि विटामीन भरपूर प्रमाणात असतात. दिवाळीच्या निमित्ताने मखाना भेट देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मखाना गिफ्टिंग बॉक्समध्ये ठेवून देऊ शकता. यामुळे कुटुंब नेहमी निरोगी राहील.
ताजी फळे (Fresh Fruits)
तुम्ही विचार करत असाल की दिवाळीला आता फळे गिफ्ट करायची का? तर होय, तुम्ही दिवाळीनिमित्त एकमेकांना फ्रूटसही भेट देऊ शकता. यामध्ये कलरफुल फळांचा समावेश करता येईल. तुम्ही संत्रा, सफरचंद, केळी, डाळिंब, अननस, स्ट्रॉबेरी, किवी, चिकू इत्यादींची टोपली तयार करून दिवाळीनिमित्त भेट देऊ शकता. फ्रूटस शरीरासाठी अत्यंत आवश्यक आणि आरोग्यदायी आहेत.
त्यासोबतच घरी बनवलेले पदार्थ चकली, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे इत्यादी तुम्ही भेट म्हणून देवू शकता. घरी बनवले असल्याने आरोग्यासाठी चांगले असतात आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे. हे सर्व पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या ब्रॅकेटच्या बॉक्समध्ये सजवून भेट म्हणून देवू शकता.
खालील पदार्थ भेटवस्तू म्हणून देणे टाळा,
1. पॅकिंग केलेले ज्यूस
2. कुकीज
3. सोनपापडी, रसगुल्ला, लाडू, बर्फी इत्यादी मिठाई.
4. चॉकलेट्स
5. केक
6. नमकीन, चिप्स
भेटवस्तूंमध्ये या गोष्टी देणे तुम्ही पूर्णपणे अवॉइड करू शकता. या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर नसून आरोग्याला हानी पोहचवतात.
तुम्ही तुमच्या मित्रांना अजून दिवाळी भेटवस्तू दिल्या नसतील तर निरोगी आरोग्य लक्षात घेऊन तुम्ही खाद्यपदार्थ द्या. आरोगयाबाबत केलेली काळजी कोणालाही आवडेल, कारण निरोगी आरोग्य हीच करोडो रुपयाची संपत्ती आहे.