Budget Diwali Gift Ideas: ही दिवाळी सर्वांसाठी खूप आनंद घेऊन आली आहे. कारण गेल्या 2 वर्षात सर्व सणसमारंभ आपण घरच्या घरीच साजरे केले. या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. आनंद आणि प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भेटवस्तु. एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे आणि आपल्या आयुष्यात तिचे काय स्थान आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा भेटवस्तु महत्वाची ठरते. या दिवाळीला तुमच्या प्रियजणांना देण्यासाठी काही भेटवस्तूंच्या आयडिया आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्या पुढीलप्रमाणे,
Table of contents [Show]
चांदीचे नाणे silver coin
दिवाळीत चांदीचे नाणे भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. चांदीचे नाणे दिवाळीला भेट म्हणून देणे हा एक चांगला पर्याय आहे. चांदीचे नाणे तुम्ही तुम्हाला हवे तसेही बनवून घेऊ शकता आणि बनवून तयार असलेले सुद्धा खरेदी करू शकता. बनवून घेतले तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज लागतो.
लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती Idols of Lakshmi-Ganesha
दिवाळीत लक्ष्मी-गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आपण आपल्या प्रियजनांसाठी भेट म्हणून लक्ष्मी-गणेशाची मूर्ती देऊन त्यांच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव ठेवू शकतो. या मूर्ती सोने, चांदी माती या पैकी कोणत्याही तुम्ही भेटवस्तु म्हणून देऊ शकता. त्यासोबतच तुम्ही मातीचे दिवे सुद्धा देऊ शकता. ही भेटवस्तु कुटुंबियांनाच नाही तर तुम्ही तुमच्या कर्मच्याऱ्यांना (Budget Diwali gifts for employees) सुद्धा देऊ शकता.
कॉफी मग Coffee mug
सद्यस्थितीत खूप जास्त डिमांड मध्ये असलेले म्हणजे कॉफी मग. किफी मग द्यायचा म्हणजे तो घ्यायचा आणि तसाच द्यायचा असे नाही. तर तुम्ही त्यावर डिझाईन बनवू शकता, तुमच्या प्रिय व्यक्तीचे फोटोही लावू शकता. अतिशय आकर्षक बनवून तुम्ही ही भेटवस्तु देवू शकता. ही भेटवस्तु तुमच्या साथीदारासाठी (innovative gift ideas for husband) उत्तम आहे. तुमच्या आयुष्यातले न विसरणारे क्षण तुम्ही या माध्यमातून जपून ठेवू शकता.
लायटिंग lighting
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, आपण दिलेल्या भेटवस्तूने एखाद्याच्या आयुष्यात चमक आली किंवा प्रकाश आला तर याहून चांगली कोणतीही गोष्ट नाही. बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. लायटिंगमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवड करून ही भेटवस्तु देऊ शकता.
फोटो फ्रेम्स Photo frames
दिवाळीचा आनंद टिपण्यासाठी फोटो फ्रेम हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबाला भेटवस्तु म्हणून देवू शकता. अनेक फोटो एकत्र करून तुम्ही ग्राफिक्सच्या सहाय्याने अविस्मरणीय भेटवस्तु तयार होऊ शकते. ही भेटवस्तु तुम्ही तुमच्या प्रियकराला (innovative gift ideas for boyfriend) देऊ शकता.
या सर्व भेटवस्तु तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या शॉपिंगसाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करू शकता. दिवाळी निमित्य क्रेडिट कार्डवर सुद्धा विशेष सूट देण्यात येत आहे.