Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर मिळवू शकता 2500 पर्यंतची सूट! जाणून घ्या सविस्तर

Infinix Zero Ultra 5G

Image Source : http://www.mysmartprice.com/

Infinix Zero Ultra 5G: 20 डिसेंबर 2022 रोजी Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच झाला. सध्या त्याची विक्री सुरू आहे, Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर तुम्ही 2500 पर्यंतची सूट मिळवू शकता, माहित करून घ्या संपूर्ण माहिती.

Infinix Zero Ultra 5G : Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन 20 डिसेंबर 2022 रोजी लाँच झाला. सध्या त्याची विक्री सुरू आहे, Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर तुम्ही 2500 पर्यंतची सूट मिळवू शकता. हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे. फोनचा फक्त एकच व्हेरिएंट बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. जाणून घेऊया त्याची किंमत, ऑफर आणि संपूर्ण माहिती. 

Infinix Zero Ultra 5G ची किंमत आणि ऑफर (Infinix Zero Ultra 5G Price and Offers)

Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन Zero Ultra 5G हा सिंगल 8GB + 256GB स्टोरेज प्रकारात आहे. त्याची लॉन्च किंमत 29,999 रुपये आहे. कॉस्लाइट सिल्व्हर आणि जेनेसिस नॉयर या दोन कलरच्या ऑप्शनसह तुम्ही फोन खरेदी करू शकता.  Infinix Zero Ultra 5G फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची विक्री 25 डिसेंबर 2022 पासून प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आहे, ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून (Flipkart Axis Bank Card) पेमेंट केल्यावर फोनच्या किंमतीवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. 2,500 रुपयांपासून सुरू होणारा फोन नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाद्वारे देखील घेतला जाऊ शकतो. 

Infinix Zero Ultra 5G डिटेल्स (Infinix Zero Ultra 5G Details)

Infinix Zero Ultra 5G मध्ये 6.8-इंच 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. यात फुल एचडी+ 2400 x1800पिक्सेल आहे. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये 900 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. मागील बाजूस 3D टेक्सचरसह काचेचे पॅनेल देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात MediaTek Dimensity 9206nm प्रोसेसर आहे. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 सह येतो.

Infinix Zero Ultra 5G  कॅमेरा आणि बॅटरी (Infinix Zero Ultra 5G Camera and Battery) 

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची सुविधा आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 200MP चा आहे. 13MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. यात 4,500mAh बॅटरी आहे, जी 12 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. फोनमध्ये चार्जिंगसाठी 180W थंडर चार्ज फीचर उपलब्ध आहे.