रिलायन्स जिओ ही भारतातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ही कंपनी कायम तत्पर असते. जिओचा प्रचार आणि प्रसार अगदी गावखेड्यापर्यंत करण्यात कंपनीला चांगले यश मिळाले आहे. कंपनीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना परवडणारे असतात आणि नेटवर्कचाही ग्राहकांना चांगला अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक स्पेशल ऑफर देण्याची योजना कंपनीने आखली आहे.
प्रीपेड प्लॅन ऑफर
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिओने एक स्पेशल प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना एक वर्षाची दीर्घकालीन वैधता दिली जाणार आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 2999 असून त्यामध्ये ग्राहकांना वेगवगेळ्या ऑफर्स आणि सुविधा देण्यात येणार आहे. जिओ कंपनीची इतर उत्पादने आणि सेवांचा लाभ देखील या ऑफरमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया हा प्रीपेड प्लॅन नेमका काय आहे आणि त्याची विशेषता.
2999 रुपयांचा प्लॅन
तसे पाहायला गेले तर जिओने ग्राहकांना जितके प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत त्यापैकी हा सर्वात महागडा असा प्रीपेड प्लॅन आहे. एक वर्षाची वैधता या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना देण्यात येत असल्यामुळे याची किंमत सर्वाधिक आहे. यात ग्राहकांना फ्री व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएस आणि दिवसाला 2.5 जीबीचा इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. थांबा! या प्रीपेड प्लॅनची ऑफर एवढ्यावरच मर्यादित नाही. ग्राहकांना आणखी स्पेशल ऑफर यासोबत दिल्या जाणार आहेत.
प्रीपेड प्लॅनचे अन्य फायदे
हा प्रीपेड प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना जिओकडून अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे जिओचे इन-हाऊस असलेले जिओ टीव्ही (JioTV),जिओ न्यूज (Jio News), जिओ सिनेमा (JioCinema) आणि जिओ क्लाउड (JioCloud ) यांचा मोफत आनंद ग्राहकांना वर्षभर घेता येणार आहे.
एवढेच नाही तर ग्राहकांना प्रीपेड प्लॅन खरेदी केल्यानंतर एकदा Swiggy वरून ऑर्डर केल्यानंतर 100 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. तसेच विमान प्रवासासाठी बुकिंग करताना ग्राहकांना तिकिटावर 1500 रुपयांची सवलत देखील मिळेल. सोबतच 4000 रुपयांपर्यंतच्या देशांतर्गत हॉटेल्सवर 15% सूट देखील दिली जाणार आहे. एवढेच नाही तर Ajio या ब्रांडचे कपडे खरेदी केल्यास फ्लॅट 200 रुपये सवलत देखील मिळणार आहे.
त्याचबरोबर तुम्ही रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत शोरूममधून इलेक्ट्रोनिक्स वस्तू जर खरेदी करत असाल तर निवडक उत्पादनांवर ग्राहकांना 10% सूट देखील दिली जाणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            