Monthly Income Plan: जर तुम्ही रिटायर झाल्यावर र इनकम(investment) गुंतवणूकीचे ऑप्शन शोधत असाल तर म्युचुअल फंडच्या (एमआयपी) मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जे लोक आपल्या सेविंग्सचा काही भाग शेअर मार्केट मध्ये गुंतवण्यासाठी इच्छुक असतात पण जास्त रिस्क घेत नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. काही लोकांच्या मते हा प्लॅन त्याच लोकांच्या जास्त उपयोगाचा आहे ज्यांना दररोजच्या गरज पूर्ण करण्यासाठी कॅश फ्लो(cash flow) पाहिजे ज्याना कॅश फ्लो बनवायचा आहे त्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. (Best Plan MIP for Post-Retirement Income)
MIP म्युच्युअल फंड कसे काम करते
एमआयपीलाच कंझर्वेटिव्ह हायब्रीड (Conservative Hybrid Fund) फंड देखील म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 75-90 टक्के हिस्सा डेट इंस्ट्रूमेंटमध्ये 10 ते 25 इक्विटीमध्ये गुंतवला जातो. यामुळे सुरक्षा आणि रिटर्न यामध्ये संतुलन व्यवस्थित राहते. शेयर मार्केटमध्ये मंदी आली तरी या प्लॅनवर त्याचा काही फरक पडत नही. एमआयपीमध्ये गुंतवणूकीसाठी कोणत्याही लिमिट नाही आणि कोणताही लॉग इन पिरीयड नाही.
डिविडंट रिटर्नची (Dividend return)गॅरंटी दिली जात नाही
या फंडाचा भाग जो इक्विटीमध्ये गुंतवला जातो तो कर्ज साधनांच्या तुलनेत जास्त रिटर्न देतो. एमआयपीवरील मासिक रिटर्न पेआउट फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असते. परंतु इक्विटीमध्ये गुंतवलेल्या भागावर रिटर्नची कोणतीही हमी नसते, कारण शेअर बाजाराच्या चढ उतराचा थेट परिणाम त्यावर होतो.
डिविडंट रिटर्नवरील टॅक्स
एमआयपींमधून मिळणार्या परताव्यावर किती टॅक्स भरावा लागेल हे फंडचा किती भाग इक्विटीमध्ये गुंतवला आहे आणि किती कर्जात आहे यावर अवलंबून आहे. बँक एफडी किंवा पोस्ट ऑफिसवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे, एमआयपी (dividends) डिविडंट रिटर्नवर देखील टॅक्सपेअर स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. परंतु फंडाची गुंतवणूक 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी केली असल्यास, इंडेक्सेशननंतर भांडवली नफ्यावर 20 टक्के टॅक्स आकारला जातो.