तुम्ही जर जिओ युजर असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्तात मस्त असा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणलाय. सध्या देशभरात जिओ आपले नेटवर्क तयार करत असून प्रतिस्पर्धी कंपन्यापेक्षा स्वस्त आणि किफायती रिचार्ज प्लॅन देण्याची जिओची योजना आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत सामान्य नागरिकांचा मात्र फायदा होताना दिसतो आहे. तेव्हा अशाच एका फायदेशीर लोकप्रिय Jio Rs 299 च्या प्रीपेड प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहेत फायदे?
या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक सुविधा अनुभवता येणार आहेत. तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 56 GB 4G मोबाइल डेटा मिळणार आहे.होय, जिओचा 4G नेटवर्क स्पीड खूप उत्तम असून भारतातील अनेक भागांत याचे नेटवर्क उपलब्ध आहे. गाव तिथे जिओ नेटवर्क अशी थीमच रिलायन्स ग्रुपने राबवली असून खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात सध्या जिओचे नेटवर्क उपलब्ध आहे.
याशिवाय युजर्सला दिवसाला 100 SMS मोफत करता येणार आहेत याशिवाय Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित व्हॉइस कॉल सुविधा युजर्सला दिली जाणार आहे. आहे की नाही खास ऑफर? थांबा, थांबा…प्रीपेड प्लॅनमध्ये दिल्या जाणाऱ्या डील्स इतक्याच नाहीये, अजून लिस्ट बाकी आहे…
एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट…
या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची खासियत अशी की तुम्हांला 28 दिवसांच्या कालावधीसाठी मोफत JioTv, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शनचा दिले जाते. तुम्ही या OTT वर तुमच्या आवडीचे सिनेमा, टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज, क्रिकेट सामने अगदी मोफत बघू शकता. आहे की नाही खास डील?
JioCloud चा असा घ्या फायदा
अनेकदा युजर्सला JioCloud ची सुविधा दिली जाते मात्र ते ही सुविधा वापरतच नाहीत. खरे तर JioCloud हे तुमचे सर्व फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, ऑडिओ, संपर्क आणि संदेशांसाठी मोफत क्लाउड स्टोरेज ॲप आहे.या ॲपमध्ये तुम्ही तुमचा डेटा अगदी सुरक्षितपणे स्टोअर करू शकता. JioCloud वर तुम्हांला ऑटो बॅकअपची सुविधा देखील दिली जाते. तुम्ही JioCloud ॲप वापरून कोणत्याही स्मार्टफोन, कॉम्प्युटर किंवा अगदी तुमच्या टीव्हीवरून तुमच्या फाइल्सचे आदानप्रदान करू शकता.