तुम्हांला तुमच्या आधार कार्डवरील माहिती जर अपडेट करायची असेल तर घरबसल्या एकही पैसा न देता तुम्ही ती अपडेट करू शकता. होय मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…
काय मिळेल सुविधा?
आजकाल प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. कुठल्या बँकेत खाते खोलणे असो, प्रवेश मिळवणे असो वा शासकीय योजना मिळवण्यासाठी नावनोंदणी करायची असो. जर तुमच्या आधार कार्डावरील तपशील जर बरोबर नसतील किंवा इतर कागदपत्रांमध्ये आणि आधार कार्डवरील तपशिलात तफावत असेल तर मग तुम्हांला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
संभाव्य अडचणी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती तुमच्या आधार कार्डवर अपडेट करायला हवे. जर तुम्हांला देखील मोफत अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर त्वरा करा कारण 14 सप्टेंबर 2023 पर्यंतच तुम्हांला घरबसल्या हे काम मोफत करता येणार आहे. त्यांनतर मात्र तुम्हांला पैसे मोजावे लागणार आहेत.
UIDAI चा सल्ला
आधार कार्डची प्रत्येक ठिकाणी लागणारी गरज लक्षात घेता दर दहा वर्षांनी नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे असा सल्ला UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने भारतीय नागरिकांना दिला आहे. आपला फोटो, राहत्या घराचा पत्ता, मोबाईल नंबर व आदी माहिती तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/portal वर मोफत अपडेट करू शकता.
मोफत सुविधा
ज्या नागरिकांना त्यांचे आधारकार्ड अपडेट करायचे आहे त्यांना केवळ myAadhaar पोर्टलवरच मोफत सुविधा मिळणार आहे. स्वतःहून ऑनलाइन अपडेट केल्यास हे शुल्क माफ असणार आहे. मात्र आधार केंद्रात जाऊन जर ही प्रोसेस केली तर तुम्हाला 50 रुपये मोजावे लागणार आहेत. खरे तर ऑनलाइन अपडेटची प्रोसेस सहजसोपी अशी आहे. हे कसे करावे याची संपूर्ण माहिती myAadhaar पोर्टलवर देण्यात आली आहे.
तुम्हाला तुमचा आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/portal वर लॉग इन करावे लागेल. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी पोर्टलवर सबमिट केल्यानंतर तुम्ही ‘Document Update’ वर क्लिक करू शकता आणि तुमचे जे डीटेल्स तुम्हाला अपडेट करायचे आहेत ते करू शकता.