• 28 Nov, 2022 13:37

क्रेडिट रेटिंग (Credit Rating) म्हणजे काय? समजून घ्या त्याचे महत्त्व आणि कार्य Credit Rating Meaning & Functions

क्रेडिट रेटिंग (Credit Rating) म्हणजे काय? समजून घ्या त्याचे महत्त्व आणि कार्य Credit Rating Meaning & Functions

तुम्ही तुमचे कर्ज कशाप्रकारे व्यवस्थापित करता यावर तुमचे क्रेडिट रेटिंग अवलंबून असते. त्यामुळे तुमचे रेटिंग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.

कर्ज देणाऱ्या बँका किंवा बिगर-बँकिंग कंपन्या या कर्ज देताना त्यांच्या नेहमीच्या प्रक्रियेचा भाग कर्ज मागणाऱ्या अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक व आर्थिक माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करत असतात. या पाहिल्या जाणाऱ्या माहितीत क्रेडिट स्कोअर आणि रेटिंग हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. लोन देणाऱ्या बॅंका कर्जदाराचा स्कोअर तपासूनच त्याला कर्ज द्यायचे की नाही ठरवतात. तर आज आपण क्रेडिट स्कोअर आणि रेटिंगबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

क्रेडिट रेटिंग (Credit Rating) कसे करतात?
क्रेडिट रेटिंग हे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करते. कर्जदार कर्जाची रक्कम वेळेवर फेडते की नाही, यावर हे रेटिंग ठरवले जाते. थोडक्यात सांगयाचे झाले तर चांगले रेटिंग म्हणजे चांगला पेमेंट इतिहास. भारतात अनेक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत. ज्या कर्ज घेतलेल्या रकमेची परतफेड करण्याची क्षमता मोजून त्याचे रेटिंग करतात. या रेटिंगसोबतच इतर घटकांची पाहणी करून त्याचा तपशीलवार अहवाल तयार करतात.

भारतात क्रेडिट रेटिंग कसे होते?
क्रेडिट रेटिंगचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक क्रेडिट रेटिंग एजन्सी स्वतःची पद्धत वापरत असते. क्रेडिट रेकॉर्ड, क्रेडिटचा प्रकार, त्याचा कालावधी, क्रेडिट वापर, क्रेडिट एक्सपोजर आदी हे क्रेडिट रेटिंगचे मुख्य घटक आहेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी प्रत्येक महिन्याला बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांकडून क्रेडिट माहिती गोळा करत असतात. त्यानंतर बॅंकांच्या सुचनेनुसार अनेक घटकांवर आधारित अहवाल तयार करतात. या अहवालाच्या आधारे, ते प्रत्येक व्यक्ती किंवा कंपनीला ग्रेड देऊन त्यांना क्रेडिट रेटिंग देतात. हे रेटिंग बँका, वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदार पैसे गुंतवायचे, बाँड खरेदी करायचे, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे हे ठरवण्यासाठी वापरतात. चांगले क्रेडिट रेटिंग असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.

भारतातील क्रेडिट रेटिंग एजन्सी
ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे आहे किंवा बँकेत क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे, अशा व्यक्तींच्या किंवा व्यावसायिकांच्या क्रेडिट प्रात्रतेचे मूल्यांकन करणाऱ्या संस्थांना क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणतात. भारतातील महत्त्वाच्या क्रेडिट एजन्सी.

क्रेडिट रेटिंग इनफॉर्मेशन सर्विस ऑफ इंडिया लिमिटेड (CRISIL) 
इंवेस्टमेंट इनफॉर्मेशन एंड क्रेडिट रेटिंग एंजेसी (IICRA)
क्रेडिट एनालिसिस एंड रिसर्च लिमिटेड (CARE)
ओनिडा इंडिविजुअल क्रेडिट रेटिंग एजेंसी ऑफ इंडिया (ONICRA)
स्मॉल मीडियम एंटरप्राइजेज रेटिंग एजेंसी ऑफ इंडिया लिमिटेड (SMERA) 
ब्रिकवर्क रेटिंग्स इंडिया प्राइवेट लिमिटेड (Brickwork Ratings)

Image Source - <a href='https://www.freepik.com/vectors/credit-score'>Credit score vector created by pch.vector - www.freepik.com</a>