पुर्वी स्त्रियांनी भोगलेल्या त्रासासाठी आणि असमान वागणुकीसाठी आता स्त्रीयांना समान वागणुक देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अर्थात आता दोघांनाही समान पातळीवर आणण्यासाठी आणि कदाचित लिंग-आधारित आर्थिक भेदभावामुळे निर्माण होणारा त्रास कमी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारांकडून महिला आणि मुलींसाठी अनेक सवलती आणि योजना उपलब्ध आहेत. सवलतीच्या विमा योजना असोत किंवा टॉप 1,000 लिस्टेड कंपन्यांसाठी किमान एक स्वतंत्र महिला संचालक मंडळावर असण्याचा सेबीचा आदेश असो, प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी काही ना काही सवलती किंवा योजना तयार केल्या आहेत. बघुया असे कोणते फ़ायदे आहेत जे खास महिलांसाठी आहेत.
1.विमा सवलत आणि कमी प्रीमियम
अनेक जीवन आणि आरोग्य विमा कंपन्या महिला-विशिष्ट योजना ऑफर करतात, मग ते गंभीर आजारांसाठी असो किंवा मुदतीच्या योजनांसाठी. विशिष्ट गंभीर आजार योजना देखील ह्यात समाविष्ट आहेत. काही बिमा कंपन्या महिला आणि मुलींसाठी सवलतीच्या हफ़्त्यांची ऑफर असते.
2. कमी कर्ज दर
बँका किंवा NBFC कडून कर्ज घेणाऱ्या महिला कर्जदारांना प्राधान्य व्याजदर मिळतो. गृहकर्जासाठी, सामान्य दरापेक्षा ०.०५% किंवा ५ बेसिस पॉइंट्स कमी व्याजदर देउ करतात. उदाहरणार्थ, जर SBI दरवर्षी ७% दराने गृहकर्ज देत असेल, तर महिला कर्जदाराला ६.९५% दराने हे कर्ज दिले जाईल. ही छोटी रक्कम वाटू शकते, परंतु यामुळे EMI किंवा कर्जाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होतो.
3. मुद्रांक शुल्क बचत
महिलांना मालमत्तेची मालकी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, देशातील विविध राज्ये महिलांना त्यांच्या नावावर घर नोंदणीकृत असल्यास त्यांना सवलतीच्या मुद्रांक शुल्काची म्हणजेच स्टॅम्प ड्युटी वर सवलत देतात. मालमत्तेच्या नोंदणीच्या वेळी देय मुद्रांक शुल्क जर ती विक्री डीड, कन्व्हेयन्स डीड किंवा गिफ्ट डीडद्वारे घेतली गेली असेल तर ती वेगवेगळ्या राज्यांमधील मालमत्तेच्या मूल्याच्या 0.5-3% पर्यंत बदलू शकते.
4. बचत बँक खाती
बँका महिलांना महिलांसाठी वेगळी बचत खाती ज्यात अधिक आणि अनोखी वैशिष्ठ्ये असलेली बचत खाती फायदे आणि बक्षिसे देतात. महिला बचत खाती कमी ओपनिंग डिपॉझिट, मोफत चेक बुक्स, ऍव्हरेज मंथली बॅलन्स आणि वैयक्तिक अपघात विमा संरक्षण यांसारखे फायदे देते. अनेकदा वुमन्स डेबिट कार्ड वर नवनवीन योजना आणि फ़ायदे देखील दिले जातात.कार्ड वापरुन केलेल्या खरेदीवर कॅश बॅक किंवा काही ठिकाणी मोफ़त भेटी आदी दिल्या जातात. काही ठिकाणी महिलांना प्रामुख्याने सर्विस दिली जाते किंवा महिलांसाठी काही काही करियर शी संबंधित कोर्सेस,व्यक्तिमत्व विकासावरील कोर्सेस वर वर फी मध्ये सूट,त्याशिवाय काही ठिकाणी लॉकर च्या फी वर 50% सूट मिळू शकते
5. सुकन्या समृद्धी योजना
जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचत करायची असेल, तर तुम्ही या सरकारी अल्पबचत योजनेची निवड करू शकता. हे 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी उघडले जाऊ शकते आणि 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा 18 वर्षांच्या वयानंतर लग्न होईपर्यंत खाते चालू ठेवले जाऊ शकते. ह्या योजनेचे दर प्रत्येक तिमाहीत सरकारद्वारे घोषित केले जातात.या योजनेमुळे तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगी मोठा आर्थिक आधार मिळु शकतो.