LPG Price Hike: 1 मार्च 2023 पासून देशभरामध्ये नवीन नियम लागू करण्यात आले. यानुसार एलपीजी सिलिंडरच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये 350.50 रुपये वाढवण्यात आली आहे. भाजीपाला, गव्हाचे पीठ, दूध आणि इतर वस्तूंच्या महागाईने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. महागाईने लोकांच्या घराचे बजेट बिघडले आहे. आता स्वयंपाकघरात स्वयंपाक करणेही महाग झाले आहे.
गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका फक्त घरगुती वापरकर्त्यांना बसला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांना सुद्धा महागाईची झळ सोसावी लागत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये 1778 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 2128 रुपयांना झाला आहे. काही महिन्यातच सिलिंडरचे दर वाढल्याने व्यावसायिक नाराजी व्यक्त करीत आहे. इतर वस्तूंची भाववाढ आणि सिलिंडरचे दरही वाढले त्यामुळे व्यवसायिकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. व्यावसायिक सिलिंडर महागल्याचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यावसायिकांना बसल्याचे समोर आले आहे.
हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सर्वात जास्त खर्च तेल आणि गॅस सिलिंडर या दोन गोष्टींवर केला जातो. त्यामुळे या दोन गोष्टींची किंमत वाढली तर त्याचा व्यवसायावर विपरित परिमाण होतो. अन्नपदार्थांची किंमत वाढवली तर ग्राहक कमी होतील या भीतीने व्यावसायिकांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. उदा. वडापावची किंमत वाढवली तर ग्राहक त्यावर दूसरा पर्याय शोधतात.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर (19 किलो)
महिना | दर |
मार्च | 2014 |
मे | 2364 |
जून | 2228 |
जुलै | 2029 |
ऑगस्ट | 1993 |
ऑक्टोबर | 1868 |
डिसेंबर | 1752 |
जानेवारी | 1778 |
फेब्रुवारी | 1778 |
मार्च | 2128 |