Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flow of foreign tourists increased: 2022 वर्षात देशात विदेशी पर्यटकांचा ओढा 117.9 टक्क्यांनी वाढला

Foreign Tourist Inflow to India

Foreign Tourist Inflow to India: करोनामध्ये थंडावलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा जोम धरू लागला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांनी भारतात भ्रमंती केली आहे. कोणत्या देशातून पर्यटक कुठे फिरायला आले ते या बातमीतून जाणून घ्या.

India Foreign Visitor Arrivals Growth: करोना काळात (Covid-19) देशांतर्गत आणि देशाबाहेपृरील सर्वच पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले होते. टाळेबंदी (Lockdown) उठल्यानंतरही पर्यटक लांब प्रवास करण्यासाठी घाबरत होते. मात्र करोनास्थिती सुरळीत झाल्यानंतर भारताकडे परदेशी पर्यंटकांचा ओढा वाढला आहे. 2021 च्या तुलनेत यावर्षी तब्बल 117.9 टक्क्यांनी परदेशी पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे, ही माहिती पर्यटन मंत्रालयाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात नमूद केलेली आहे.

भारतात पर्यटनाला वाव मिळावा, सरकार, खाजगी संस्था अनेक उपक्रम राबवत असतात. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) पर्यटन क्षेत्राच 5.19 टक्के योगदान आहे. यामुळे भारतात 79.86 दशलक्ष रोजगार प्रत्यक्षरित्या मिळतात. त्यामुळे भारतासाठी पर्यटन खूप महत्त्वाचे आहे, विशेष म्हणजे परदेशी पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळते. तसेच याचा अप्रत्यक्ष सकारात्मक परिणाम परदेशी गुंतवणुकीवर पडतो. यासह, परदेशी पर्यटक आल्यामुळे हॉटेल, लहान दुकाने, वाहतूक, रेस्टॉरंट आदी व्यवसायाला चालना मिळते, असे पीआयबीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

2022 या वर्षात 3 लाख 42 हजार 308 परदेशी पर्यटक भारतात आले. मागील वर्षी म्हणजे 2021 मध्ये 1 लाख 23 हजार 179 एवढे पर्यटक भारतात आले होते, यातुलनेत यंदा 117.9 टक्के पर्यटक अधिक आले आहेत. युएसएमधून (USA) सर्वाधिक 24.58 टक्के पर्यटक भारतात आले. त्या खालोखाल युके, बांग्लादेश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, जर्मनी, सिंगापूर, फ्रान्स, मालदीव, पोर्तुगाल, रशिया, ओमान आणि इटलीमधून आले होते.

यंदा आलेले पर्यटक हे मुंबई आणि दिल्ली येथे फिरण्यासाठी गेले. त्यानंतर पर्यटकांनी जयपूर, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, बंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम, हरिदासपूर, गोवा, तिरुचिरापल्ली, अहमदाबाद आणि अमृतसर आदी शहरांमध्ये फिरण्यासाठी प्राधान्य दिले. दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे, पर्यटक सर्वप्रथम राजधानी फिरण्यासाठी प्राधान्य देतात. त्यानंतर मुंबई हे जगप्रसिद्ध शहर आहे एक म्हणजे येथील उद्योग-धंदे, व्यवसाय, देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि दुसरे म्हणजे बॉलिवुडमुळे हे शहर सुप्रसिद्ध झाले आहे. यामुळे येथे दरवर्षी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. यामागोमाग सर्वाधिक पर्यटक राजस्थान विशेषत: जयपूरला येतात. भारताचा इतिहास, रॉयल्टी पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी येत असतात. जयपूर हे कायमच परदेशी पर्यटकांमधले लोकप्रिय ठिकाण आहे.