Gadgets Discontinued in 2022: दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. 2022 हे वर्ष तंत्रज्ञान प्रणालीसाठी फार महत्वाचे ठरते. या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन, गॅजेट्स, बाइक, EV लाँच झाल्यात. ग्राहकांनी सुद्धा याला भरभरून प्रेम दिले. नवनवीन बाबी आत्मसात करून त्यासोबत स्वतः अॅडजस्ट करून घेतलं. काही गॅजेट्स त्यांच्या फीचर्समुळे चर्चेत आले. आयफोन 14 सारखे उत्तम फीचर्स असणारे मोबईल सुद्धा 2022 मध्ये लाँच झाले. लाँच झाले तसेच अनेक गॅजेट्स बंद सुद्धा झालेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
Table of contents [Show]
अॅपल वॉच सिरीज 3 (Apple Watch Series 3)
ही वॉच सिरिज सप्टेंबर 2017 मध्ये लाँच केली होती. पाच वर्षांपेक्षा जास्त Apple Watch Series 3 स्मार्टवॉचची विक्री केली. पण आताच्या ट्रेंडला शोभेल असे तिचे लुक नसल्याने ती बंद करण्यात आली. ही वॉच सर्व सामन्यांच्या बजेटमध्ये बसेल अशी होती. ती तिच्या फीचर्समुळे खूप चर्चेत असून लोकप्रिय सुद्धा होती.
अमेझॉन ग्लो (Amazon Glow)
अमेझॉन ग्लो हे एक चॅट डिव्हाइस आहे. याद्वारे मुलांना व्हिडिओ चॅट करता येत होते. Amazon Glow या डिव्हाइसची विक्री 6 महिन्यानंतरच थांबवण्यात आली. एक वर्षापूर्वी लॉन्च केलेला, Amazon Glow कंपनीच्या ग्रँड चॅलेंज मूनशॉट प्रयोगशाळेतून उदयास आला. स्क्रीन आणि प्रोजेक्टर ज्याने मुलांना वेळ मिळविण्यात, गेम खेळण्यास, वाचण्यात मदत केली.
आयपॉड टच (iPod touch)
या वर्षी 2022 मध्ये iPod Touch बंद करण्यात आला. आयपॉड टच 2001 मध्ये आयपॉड लाँच केला होता. पण आता 20 वर्षांच्या प्रवासानंतर कंपनी ते बंद केले. अॅपलने पोर्टेबल म्युझिक प्लेअर मार्केटमध्ये मोठे स्थान निर्माण केले नसेल, परंतु अॅपलचे आयपॉड त्याच्या अद्वितीय स्क्रोल व्हील आणि लहान आकारामुळे खूप लोकप्रिय होते. Apple ने iPod mini, iPod nano, iPod shuffle आणि iPod Touch सीरीज लाँच केल्या होत्या ज्यांना संगीत प्रेमींनी पसंती दिली होती.
ब्लॅकबेरी (Blackberry)
4 जानेवारी 2022 रोजी, BlackBerry ने आमच्या लेगेसी सॉफ्टवेअर आणि फोन ऑपरेटिंग सिस्टमद्वारे वापरल्या जाणार्या पायाभूत सुविधा आणि सेवा रद्द केल्या. 2017 मध्ये, BlackBerry ने एक सॉफ्टवेअर कंपनी म्हणून स्वतःला पुन्हा शोधून काढले ज्यावर सर्व उपकरणे आणि सिस्टम व्यवसाय अवलंबून आहेत. 500 दशलक्षाहून अधिक मोबाइल, डेस्कटॉप आणि IoT एंडपॉइंट डिव्हाइस सुरक्षितपणे कनेक्ट करतो.
गुगल स्टाडिआ (Google Stadia)
Google ने जानेवारी 2023 मध्ये आपली क्लाउड-आधारित गेमिंग सेवा Stadia बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन टेक दिग्गज गुगलने सांगितले आहे की ते त्यांची गेम स्ट्रीमिंग सेवा Stadia बंद करणार आहे. पुढील वर्षी 18 जानेवारीला ते बंद होणार आहे. जीएसएम एरिनाच्या म्हणण्यानुसार, कंपनी सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी केलेल्या वापरकर्त्यांना पैसे परत करेल. याशिवाय स्टॅडिया कंट्रोलर खरेदी करणाऱ्या लोकांनाही परतावा मिळेल.