दररोज सुमारे 11,000 ट्रेन धावतात आणि त्यातून करोडो लोक प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं जनरल डब्यातून (General coach) प्रवास करतात. एसी क्लाससाठीच्या प्रवाशांसाठी पॅन्ट्री कारची (Pantry car) सोय आहे. मात्र जनरल डब्यात अशी कोणतीही सुविधा मिळत नाही. त्यामुळे यातल्या प्रवाशांना जेवणाच्या बाबतीत समस्या येतात. स्टेशन येईपर्यंत वाट पाहावी लागते. मात्र आता रेल्वेनं जनरल डब्यातल्या या प्रवाशांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. फक्त 20 रुपये देऊन पोटभर जेवण (Food) दिलं जाणार आहे. 51 स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आणखी इतर स्थानकांवर लवकरच ही सुविधा सुरू करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे.
Table of contents [Show]
थाळीमध्ये काय?
या सुविधेचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे जनरल डबे ज्या प्लॅटफॉर्मवर थांबतात, त्याच प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थांचा स्टॉल लावण्यात येणार आहे. ही सुविधआ आयआरसीटीसी किचनच्या (IRCTC) युनिट्समधून पुरवली जात आहे. सात पुऱ्या, बटाट्याची सुकी भाजी आणि लोणचं असं या थाळीचं स्वरूप असून प्रवाशांना ती 20 रुपयांना दिली जात आहे. नवभारत टाइम्सनं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
एक्सटेंडेड सर्व्हिस काउंटर्स
रेल्वे बोर्डानं सर्व विभागांना याबाबत व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. त्याला एक्सटेंडेड सर्व्हिस काउंटर्स असं नाव देण्यात आलं आहे. हा उपक्रम सहा महिने प्रयोग म्हणून चालवला जात होता. आयआरसीटीसी झोनला ही सुविधा किचन युनिट्सद्वारे पुरवण्यास सांगण्यात आलं आहे आणि यासाठी विभागीय रेल्वेशी समन्वय साधण्यास सांगितलं आहे.
कोणत्या स्टेशन्सवर सुविधा?
रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवरच्या जनरल वर्गाच्या डब्याजवळ फूड काउंटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय रेल्वेला जागा निश्चित करण्यास सांगितलं आहे. नॉर्थ झोन, इस्ट झोन, वेस्ट झोन, साउथ झोन तसंच साउथ सेंट्रल झोन अशा स्टेशन्सवर ही सुविधा असणार आहे. संपूर्ण यादी...
जेवणासोबत पाण्याचा ग्लासही...
जनरल डब्यातल्या प्रवाशांना समोर ठेवून ही सुविधा अत्यंत कमी दरात सुरू करण्यात आली आहे. फक्त 20 रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. 7 पुऱ्या, बटाटा सुकी भाजी आणि लोणचं यात असणार आहे. कॉम्बो ऑफर अंतर्गत, राजमा/छोले, खिचडी/पोंगल, कुलचे/भटुरे, पावभाजी आणि मसाला डोसा 50 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच लोकांना 200 मिली पाण्याचा ग्लास फक्त 3 रुपयांना मिळत आहे. साधारणपणे स्टेशन्सवर पाण्याची बाटली (Rail neer) 15 रुपयांना मिळते.